पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें, पांच पवें होती. तेव्हां खंडात्मक विभाग नव्हते. सृष्टिखंडांत ( वर दिलेल्या उताऱ्यांत ) या पंचपर्वात्मक पाद्माचाच उल्लेख आहे. ( २ ) प्रथम संस्करणांत पौष्करपर्व पहिले धरिलें असूनही दुसऱ्या संस्करणांत पौष्कर दुसन्या खंडांत घालण्यांत आलें व सृष्टिखंडानें पहिलें स्थान पटकावलें ! दाक्षिणात्य पाद्मोत्तरखंडावरून ही व्यवस्था कळून येते ! ( ३ ) तिसऱ्या संस्करणांत पौष्करखंडाचा अजी लोपच झाला; किंवा सृष्टिखंडाच्या पौष्करमाहात्म्यांतच त्याचा अंतर्भाव करण्यात आला व स्वर्गखंडानें पौष्कराची जागा बळकावली ! पद्मपुराण ( गौडीय ) व नारदपुराण यांवरून या तिसऱ्या संस्करणाची माहिती मिळते. ( ४ ) यानंतरही चौथें संस्करण या पुराणास मिळाले असावें. दाक्षिणा- त्यांनीं ब्रह्मखंड ऊर्फ स्वगत्तरखंड म्हणून स्वर्गखंडानंतर मध्येंच एक उंटाचें पिळूं सारून दिलें; शिवाय, त्यांचा वेगळाही अनुक्रम असा आहे:-- आदिखंड, भूमिखंड, ब्रह्मखंड, पातालखंड, सृष्टिखंड व उत्तरखंड. आनंदाश्रमांतील पद्मपुराणांतील आदिखंड व ब्रह्मखंड पाद्मपुराणाचे भाग म्हणून कोणीही गौड पुराणिक मानणार नाहीत ! ह्या देशांतील पुष्कळशा सृष्टिखंडाच्या पोथ्यांनाच ' आदि ' किंवा ' ब्रह्म ' खंड असें म्हणतात. पुराणाच्या लक्षणानुसारही सृष्टिखंडच पहिले आहे. आनंदाश्रमां- तील ' आदि ' व ' ब्रह्म ' खंडे पाहिली म्हणजे ते पाद्माव्यतिरिक्त स्वतंत्र ग्रंथ आहेत असें नारदपुराण सूचीवरून वाटतें. या सर्व हकीकतींवरून पद्मपुराणावर बरेच वेळां, बरेच संस्कार झालेले आहेत हे कळून येईल. अगदी शेवटी शेवटीं देखील रामानुजाचार्य व मध्वाचार्य यांच्या मतांचें प्रावल्य इकडे झाल्यानंतरही मतवाद्यांनीं यांत फेरफार केलेले आहेत असे कळून येईल. आपापल्या सांप्रदायाला पुराणत्व