पुराणनिरीक्षण. आणण्यासाठी त्यांनी या पुराणांतून श्लोकावलि घुसडून दिलेली आहे ! पाखंड्यांचें लक्षण, मायावादनिंदा, ' तामस ' पुराणवर्णन, ऊर्ध्वपुंड्रादि- धारण, द्वैतवादाची ख्याति इत्यादि विषय तिसऱ्या संस्करणाच्या वेळीं असते तर ते नारदपुराणाच्या सूर्चीत आले असते ! चौथ्या संस्करणांत या सर्व आधुनिक कथा घुसडल्या गेल्या आहेत ! उत्तरखंड, ( २६३-६६ ते ८९ पहा; ) तामसशास्त्रे, ( उत्तर, अ. २३५ श्लो. २-१३ पहा; ) तामसपुराणें तेथेंच श्लोक १८ - २६ पहा ). याप्रमाणें २३५ व्या अध्या- यांत, मत्स्य,कूर्म,लिंग, शिव व स्कंद या पुराणांस व तसेंच, गौतम,बृहस्पति, संवर्त, यम, सांख्य, व उशना या स्मृतींस तामस व नरकप्रद ठरविलेलें आहे ! तसेंच, पाखंड्यांची व्याख्या अशी ठरविली आहे ! शंखचक्रोर्ध्वपुंड्रादिचिन्हैः प्रियतमैर्हरेः । रहिता ये द्विजा देवि ! ते वै पाखंडिनः स्मृताः ॥ उत्तरखंड, २३५-५. याप्रकारें यांत संप्रदायद्वेषमूलक मजकूर आहे; हा मजकूर व्यासांचा असणें शक्यच नाहीं ! हा मतवाद्यांचाच आहे. संप्रदायाचा द्वेष एकेवेळी इतका वाढला होता, की त्यामुळे पुराणांत देखील, नवीन मजकूर घुसडू मतवाले आपल्या मनाची ( परमताच्या द्वेषाची ) हौस पुरी करून घेत असत, असें मोठ्या कष्टानें म्हणावें लागतें. स्वगत्तर ऊर्फ ब्रह्मखंड, उत्तरखंडाचा कांहीं भाग व क्रियायोगसार हे भाग मूळच्या पद्मपुराणांत असल्याप्रमाणे दिसत नाहीत. या पुराणाची अध्यायसंख्या व श्लोकसंख्या येणेंप्रमाणे आहे:- - अ. श्लोक. ५२ ८२-११०५२. १ सृष्टिखंड... २ भूमिखंड... १२५- ६५४०.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/६७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही