प्रकरण दुसरें. हा श्लोक हल्ली ६ व्या अंशाच्या आठव्या अध्यायांत ५५ वा आहे; म्हणजे तो अखेरीसच आहे. आमच्याप्रमाणेंच श्रीशंकराचार्याचीही साहाव्या अंशालाच विष्णुपुराण संपतें अशी समजूत होती; व ते विष्णुधर्मोत्तरांतून स्वतंत्रपणें उतारे घेत असल्यामुळे असे समजावें लागतें कीं श्रीशंकराचार्यांचे वेळीं, विष्णुपुराण व विष्णुधर्मोत्तर ( पूर्वभाग व उत्तरभाग ) हे एकाच ग्रंथाचे भाग आहेत अशी कल्पनाही नव्हती; ते स्वतंत्र ग्रंथ आहेत अशी. कल्पना होती; पण याहीपूर्वी नारदपुराणानें जे वेळीं पुराणांचें निरीक्षण केले असेल ते वेळी ते दोन्ही एकाच पुराणाचे भाग असे मानीत असले पाहिजेत हैं उघड होतें. यावरून हेंही पण ठरून जातें की नारदपुराणाचें पुराणनिरीक्षण श्रीशंकराचार्योहून प्राचीनतर आहे; एरव्हीं ही संगति लागतच नाहीं ! असो. ६१ याप्रमाणें हल्लीं जें विष्णुपुराण म्हणून उपलब्ध आहे ते फक्त विष्णु- पुराणाचा पूर्वभाग आहे. त्याची संख्या ७००० आहे. विष्णुधर्मोत्तर हल्ली जेवढे मिळतें तेवढे त्यांत मिळविले म्हणजे जवळ जवळ १६००० श्लोक होतात; यावरून असें म्हणावे लागतें कीं, विष्णुधर्मोत्तराकडे लोकांचें विशेष लक्ष नसल्यामुळे त्याचा जवळ जवळ ७००० श्लोकांचा भाग लुप्त झाला ! विष्णुधर्मोत्तरग्रंथ पुरा मिळत नाहीं असेंच म्हटले पाहिजे. सूर्य- सिद्धांताचा टीकाकार म्हणतो कीं ब्रह्मगुप्तानें आपली ज्योतिषपद्धति विष्णु- धर्मोत्तरपुराणावरून घेतली अशी परंपरा आहे; व वरील नारदपुराण- सूचीवरून विष्णुधर्मोत्तरांत ज्योतिषाचा अंश होता हैं कळून येतें. काश्मिरांत प्रचलित असलेल्या विष्णुधर्मोत्तरांत ज्योतिषांश बराच आहे असें अष्टादशपुराणदर्पणकाराचें मत आहे. नारदीय सूचीच्या वेळी चौथ्या अंशांत भविष्यकालीन राजांची माहिती होती का नाहीं हें स्पष्टपणें कळत नाहीं; तथापि, तिसऱ्या अंशांतील
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/७६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही