प्रकरण दुसरें, ग्रंथ आहे !! याच्या संहिताः - विद्येश्वर १० हजार, रौद्र ८ हजार, विनायक ८ हजार, औम ८ हजार, मातृ ८ हजार, रुद्रैकादश १३ हजार, कैलास ६ हज़ार, शतरुद्र, कोटिरुद्र व सहस्रकोटिरुद्रसंहिता प्रत्येकी दहा दहा हजार, वायुसंहिता ४ हजार, व धर्मसंहिता ५ हजार --येणेप्रमाणें एक लक्ष ग्रंथ आहे. • महापुराणांपैकी चौथें जें शैव ऊर्फ वायुपुराण त्याची संख्या कोठेंही २४००० वर सांगितलेली नाहीं; तेव्हां त्या शैवपुराणाचा व एकलक्षा- त्मक शैवपुराणाचा कांहीं संबंध नाहीं हैं उघड होतें. हैं असलेच तर एकादें उपपुराण असेल ! मुंबईत जें शिवपुराण म्हणून छापलेलें आहे त्यांत खालील संहिता आहेत:- १ विद्येश्वरसंहिता २ रुद्रसंहिता ३ शतरुद्रसंहिता २००० श्लोक. १०५३० " २१५० २२४० १८४० १२४० ४००० २४००० याप्रमाणे हा २४००० श्लोकसंख्येचा ग्रंथ मिळून सात संहितांचा ग्रंथ छापलेला आहे !! हा पुन्हा वरील बारा संहितांच्या एक लक्षात्मक ग्रंथाश जुळतच नाहीं ! निदान याची ग्रंथसंख्या तरी २४००० आहे. नारद - पुराणाच्या वायुपुराण म्हणून दिलेल्या वर्णनाश हें जमत नाहींच ! असो. यावरून, एवढ़ें सिद्ध होतें कीं वायुपुराणास जरी शैवपुराण म्हणून दुसरें नांव असले तरी ' शैवपुराण' नांवाचा दुसराही एक स्वतंत्र ग्रंथ आहे. ४ कोटिरुद्रसंहिता ५ औमसंहिता ६ कैलाससंहिता ७ वायुसंहिता " ६७ 22 99
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/८२
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही