पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. प्रचलित शिवपुराणांतील ज्ञानसंहितेच्या ९-२४ अध्यायांचा सारांश घेऊनच कालिदासानें कुमारसंभवाची रचना केलेली आहे, असें कळून येईल. ज्या पुराणाचें सद्यःस्वरूप वरेंच प्राचीनतर आहे, अशा पुराणांमध्ये वायुपुराण हैं एक आहे, हें वर सांगितलेलेंच आहे. बाणानें वायुपुरा- णाचा दोन ठिकाणीं उल्लेख केलेला आहेः— ७० - ( १ ) गमकैर्मधुरैराक्षिपन्मनांसि श्रोतॄणां गीत्या पवमानप्रोक्तं पुराणं पपाठ । ( हर्षचरित्र, निर्णयसागरी प्रत, पृ. ८५९८६.). ( २ ) यत्र च महाभारते शकुनिवधः पुराणे वायुमलपितम् । ( कादंबरी, Peterson Edition, P. 41 ) या दोन्ही ठिकाणी वायुप्रोक्त पुराणाचा म्ह. वायुपुराणाचाच उल्लेख आहे, याबद्दल पंडितांमध्ये मतभेद नाहीं. बाणाचा उदय इ. स. ६०० च्यानंतर थोड्याच काळाने झाला. बाणापूर्वी हें पुराण निदान १५० | २०० वर्षे तरी प्रचलित असले पाहिजे. म्हणजे हें पुराण इ. स. ४०० च्या सुमारास सद्यः स्वरूप पावले असावें. हेंच अनुमान दुसऱ्याही एका गोष्टीवरून निघतें. वायुपुराणाच्या भविष्यभागांत, गुप्त राजे प्रयाग, साकेत व गंगाकांढचा मगधदेश यांवर राज्य करितील असें सांगितले आहे:-- अनुगंगं प्रयागं च साकेतं मगघांस्तथा । एताञ्जनपदान्त्सर्वान् भोक्ष्यंते गुप्तवंशजाः ॥ या गुप्तांच्या वर्णनाविषय रा. दे. रा. भांडारकर हे लिहितात कींः— “ This is doubtless a description of the Guptas before they became paramount sovereigns. From the Allahābad and Erán inscriptions, we conclude that the dominions of समुद्रगुप्त had spread as far as the United and the Central