पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण, प्रतीत या अध्यायांत फक्त २५९ च श्लोक आहेत; म्हणजे यांत भवि- ष्याचा भागच नाहीं. मूळचें वायुपुराण अधिसीम (सोम) कृष्ण राजाच्या वेळी सांगितले गेलें आहे :- ७२ अधिसीमकृष्णो धर्मात्मा सांप्रतोऽयं महायशाः । वायुपुराण, अ० ९९ - श्लोक २५८. एका हस्तलिखित प्रतीत भविष्याचे श्लोकच नाहींत ही गोष्ट मह- श्त्वाची आहे; कारण यायोगें एके काळी व एका परंपरेंत हे श्लोक नव्हते हैं सिद्ध होतें; व भविष्याचे भाग जे पुराणांतून आढळतात ते मूळच्या व्यासकृत पुराणांतले नसून ते दुसऱ्यांच्या हातचे आहेत सिद्ध होतें. भविष्याचे भाग मूळ कोणत्या पुराणानें लिहिले हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे; वायु, मत्स्य व ब्रह्मांड पुराणांतून भविष्यकालीन राजे व त्यांचे राज्यकाल दिलेले आहेत; विष्णु व भागवत यांतून फक्त संख्यांच्या बेरजा तेवढ्या दिलेल्या आहेत. प्रत्येक वंशाच्या कालसंख्येच्या बेरजा देणाऱ्या पुराणांपेक्षां त्या त्या वंशांतील राजांची तपशीलवार हकीकत देणारी पुराणेंच भविष्याच्या भागांत प्राचीनतर असली पाहिजेत हैं उघड होतें. असा तपशील ज्या ज्या पुराणांनी दिलेला आहे, ती पुराणें म्हटलीं म्हणजे वायु, मत्स्य व ब्रह्मांड हीं तीनच होत. यांत पूर्वापरतेचा अनु क्रम पुनः कसा लावावा हा एक प्रश्न आहे. याचा विचार केला असतां वायुपुराणाच्या भविष्यभागासच सर्वांत प्राचीनत्व द्यावें लागेल. कारण, त्यानेंच अधिक तपशील दिलेला आहे. जसें, परिक्षितापासून क्षेमकापर्यंत चंद्रवंशांत २५ राजे भविष्यत्कालीं होतील असे म्हटले आहे:- पंचविंशनृपा ह्येते भविष्याः पूर्व - ( पुरु ) वंशजाः ॥ श्लोक, २७७. १ या राजाचें नांव अधिसीमकृष्ण अगर अधिसोमकृष्ण अशा दोन्ही रीतींनी लिहिलेलें पुराणांतून आढळून येतें.