७४ पुराण निरीक्षण. एतत्ते सर्वमाख्यातमतीतानागतं तथा ॥ वायुप्रोक्तमनुस्मृत्य पुराणं ऋषिसंस्तुतम् ॥ महाभारत, ३-१९१-१६. हा उल्लेख वनपर्वोत आहे. यांत वायुपुराणाचा उल्लेख जो वर दिलेला आहे, त्यांत वायुपुराणानें प्राचीन (अतीत ) गोष्टींबरोबरच, भविष्यत्कालीन गोष्टीही ( अनागत ) सांगितल्याचा उल्लेख आहे. हा उल्लेख फारच मह- ध्वाचा आहे. महाभारताच्या सद्यः स्वरूपकर्त्यास ( मग हें सद्यःस्वरूप केव्हांही त्यास प्राप्त झालेले असो ) वायुपुराणांत अनागत म्हणजे भविष्य- कालीन गोष्टींचा उल्लेख असल्याचें माहीत होतें; म्हणजे, बऱ्याच प्राचीन- काळापासून वायुपुराणांतून भविष्याचा भाग आढळतो, हें यावरून सिद्ध होतें. रा. व. चिंतामणराव वैद्य यांनीं सर्व गोष्टींचा विचार करून महा- भारताला सद्य: स्वरूप केव्हां प्राप्त झालेले असावें, याबद्दल असे उद्गार काढिलेले आहेत:- - “ If we take all the evidence heretofore detailed into consideration, we may conclude generally that the Maha- Bharata assumed its present form between three to one hundred B. C, The Mahabharata; a Criticism. P. 21. याच विषयीं A. Macdonnel साहेबांनी आपल्या A History of Sanskrit Literature मध्यें असे लिहिलेलें आहे कीं:- “ What evidence have we as to when the महाभारत attain- ed to the form in which we posses it? There is an inscrip- tion in a land-grant dating from 462 A. D. or at the latest 532 A. D. which proves in-controvertibly that the epic about 500 A. D, was practically of exactly the same length as it is stated to have in the survey of contents (अनुक्रमणिका) given in Book I, and as it actually has it now; for it con-
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/८९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही