पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. श्रीधरी- ( ३ ) परमहंसप्रिया हरिलीला ग्रंथ भागवताची अनुक्रमणीरूप असून त्यावर हेमाद्रीची टीका आहे; त्या टीकेंत भागवतावरील टीकेचा उल्लेख आहे. हेमाद्रि व बोपदेव हे दोघेही भागवतास प्राचीन आर्ष ग्रंथ मानीत आहेत, इतकेच नव्हे, तर श्रीधरी टीकाही त्यांहून प्राचीनतर आहे. बोपदेवाचा जन्म शके ११८२ मध्ये झाला. तेव्हां श्रीधरी टीका निदान शके ११०० इतकी तरी जुनी असली पाहिजे, हें उघड होतें. आनंदस्य हरेललां वक्ता भागवतागमः | स्कंधैर्द्वादशभिः शाखाः प्रतन्वन् द्विजसेविताः ॥ २ ॥ वेदः पुराणं काव्यं च प्रभुर्मित्रं प्रियेवं॑ च । बोधयंतीति ह प्राहुत्रिवद्भागवतं पुनः ॥ १० ॥ इति भागवतेऽध्याया एकत्रिंशच्छतत्रयम् । एकादिनियमेनैतानभ्यसेच्छक्तितोऽन्वहम् ॥१०॥ वक्ता श्रोतर्यथ श्रोता वक्तर्यन्यत्र चिंतकः ॥११॥ इति भागवतस्यानुक्रमणी रमणी कृता । विदुषा बोपदेवेन विद्वत्केशवसूनुना || हरिलीलेति नामेयं हरिभक्तैर्विलोक्यताम् || अस्या विलोकनादेव हरौ भक्तिर्विवर्धते ॥ हरिलीला. यावरून हरिलीला ही भागवताची अनुक्रमणी असून तेव्हां भागवताचें स्वरूप आतांप्रमाणेंच होतें हैं कळून येईल; विशेषेकरून भागवतांतील १२ व्या स्कंधांतील भविष्य तेव्हांही होतेंच. या हरिलीलेवरच्या टीकेंत वारंवार हेमाद्रीनें श्रीधराचार्याच्या टीकेचा उल्लेख केलेला आहे. एकच उदाहरण येथें देतों :-- १. येथे ' प्रियावचः ' असाही पाठ आहे.