पुराणानिरीक्षण. , श्रीधराचार्यानीं ' शृण्वंति गायंति गृणंति साधवः ( १ – ५ – ११ व १२-१२-५१ ) यावर अशी टीका केलेली आहे:- ७८ ‘ साधवो महांतो वक्तरि सति शृण्वंति । श्रोतरि सति गृणंति । अन्यदा स्वयमेव गायंति कीर्तयंति । ' व 'वक्तरि सति शृ॒ण्वंति । श्रोतरि सति गायंति । नोचेत्स्वयमेव गृणंति । ' हेमाद्रीनें वर उतरून घेतलेल्या ' एकादिनियमेनैतान्' या श्लोका- वर टीका करितेवेळी म्हटले आहे कीं,- ‘ एकादीति । किं च अन्यस्मिन् श्रोतर्युपस्थिते वक्ता भवेत् । स्वाधिके च वक्तर्युपस्थिते अभिमानं त्यक्त्वा स्वयं श्रोता भवेत् । उभयाभावे स्वयमेव शास्त्रार्थ चिंतयेत् । इत्येषाऽभ्यासप्रक्रिया । एतन्च शृण्वंति गायंति गृणंति साधवः " इत्यत्र स्पष्टीकृत- माचार्येण । ' 66 याशिवाय, आणखी अनेक ठाई श्रीधराचार्योच्या टीकेचे हेमाद्रीनें उतारे घेतलेले आहेत. यावरून बोपदेवानें भागवत केलें नाहीं, इतकेंच नव्हे तर श्रीधरीटीकाही (शके ११०० ) त्याहून प्राचीन आहे. तात्पर्य - निर्णयकारांनी यासाठींच म्हटले आहे कीं:- बोपदेवकृतत्वे च बोपदेवपुराभवैः । कथं टीकाः कृताः संस्युर्हनुमच्चित्सुखादिभिः ॥ " बोपदेवानें भागवत केले असतें तर बोपदेवाहूनही प्राचीन अशा हनुमत् व चित्सुख यांनी त्यावर कशा टीका केल्या असत्या ? " शके १०९० मध्यें रचिलेल्या गौडपति लक्ष्मणसेन याच्या अद्भुत- सागर ग्रंथांत भागवत व विष्णुधर्मोत्तर यांतील उतारे आहेत.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/९३
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही