पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. ( णास महापुराण • समजत होतें; व महापुराणांचे यादीतील पांचवें पुराण आपणच आही, असे पहिल्या स्कंधाच्या दुसऱ्या अध्यायांत त्यानें म्हटलेले आहे. देवीभागवतानें आपली ग्रंथसंख्या स्कंध १२- अ. ३१८ • व श्लोक १८००० अशी दिलेली आहे. देवीभागवताचीं व विष्णुभाग- वताची सर्व लक्षणे जुळतात, पण वैष्णवभागवताची अध्यायसंख्या ३३१- ३२ असून देवीभागवताची ३१८ आहे; हा मोठा फरक आहे ! बाकीची चिन्हें सर्व जुळतील अशीच योजना केलेली आहे; पण दुसऱ्या एका प्रमाणावरून खात्रीनें देवीभागवत महापुराण नव्हे हैं सिद्ध होतें; तें असें कीं, देवीभागवतानें आपणास महापुराणांत घालून, दुसरें एक भागवत उपपुराणांत घातलेले आहे ! पहा - माहेश्वरं भागवतं वासिष्ठं च सविस्तरम् । ८४ पण; देवी भा. पहिला स्कंध, अ. ३, येथें टीकाकार म्हणतो, हें भागवत म्हणजे 'वैष्णव भागवत 'च होय ! वै. भागवतांत उपपुराणांचा व दुसऱ्या भागवताचा बिलकूल उल्लेख नसून, देवीभागवतांत मात्र दुसऱ्या भागवताचा व तोही उपपुराणांत उल्लेख आढळतो. यावरून वै. भागवत प्राचीन व मूळचें महापुराण होय हैं अनायासेंच ठरून, देवीभागवताचें धाष्टयं मात्र जगापुढें येतें ! देवीभागवतानें स्वतःच्या हातानें स्वतःस पकडून घेतले आहे ! देवीभागवतटोकाकार नीळकंठ याची दे. भा. ची प्रस्तावना पुरा- णांचा अभ्यास करणाऱ्यांनी वाचण्यासारखी आहे. त्या टीकाकारानें दे. भा. ची जरी तरफदारी केलेली आहे तरी देवीभागवताच्या स्वतःच्या पुराव्यावरून व श्रीधरस्वामींच्या वरील वचनावरून श्रीमद्भागवत- वैष्णव ) च मूळचें पुराण ठरतें ! यांत ओघाओघानें देवी- भागवत श्रीधरस्वामींहून ( इ० स० ११०० ) प्राचीन दिसतें, हेंही कळून आलें! देवीभागवताच्या काळाबद्दल ओघानें येथेंच विवेचन करितों.'