पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जन्म, बालपण व शिक्षण.

राहिल्यावर त्यांनी आपला स्वच्छंद कार्यक्रम सुरू केला. लो. टिळकांप्रमाणे त्यांनी येथे प्रकृतीची फार उत्तन काळजी घेतली. भावी आयुष्यांत अत्यंत कष्टप्रद काम तीन तपें त्यांनी जें केलें त्यासाठीं वज्रप्राय कणखर शरीर असणे जरूर होतें. त्यांचा ह्या वेळचा कार्यक्रम त्यांच्यांन शब्दांत सांगितला तर फार योग्य होईल. "नियमानें पांच वाजतां पहांटेस मी उठत असे व तालमीत जाऊन दोन तास उत्तम मेहनत करीत असे. बैठका, जोर, जोडी, मलखांब व कुस्ती अशी सुमार दीड दोन हजार मेहनत रोजची होई, तो सात वाजत. नंतर शेर दीडशेर दूध पिऊन अर्धा तास कॉलेजाभोवतालील मैदानांत व झाडाखाली सहल व विश्रांति घेई. आठपासून नऊपर्यंतचा वेळ वर्तमानपत्रे वाचण्यांत जाई. पुढें एक तास नदीवर पोहणें होत असे. परत येऊन भोजन आटोपून खोलीकडे जो यावे तो नेमके साडेअकरा वाजत. नंतर अर्धा तास समानशील अशा दोन चार सद्गृहस्थांच्या समागमांत धूम्रपान आटोपून कॉलेजांतील पुस्तकालयांतून आणिलेले एखादें पुस्तक हिंडून, फिरून निजून व बसून मी चांगले वाचून मनन करीत असें. वर्गांतील शिक्षकांच्या व्याख्यानांस मी प्रायः कधी जात नसें. इतर परीक्षार्थी विद्यार्थी जे चार तास वर्गात घालवीत ते मी स्वतंत्र पुस्तकें वाचण्यांत घालवी. वाचण्याचें काम साडे-चार चारपर्यंत चालें व नंतर बंद होई. मग शादिलबोवा- जवळील होडीखान्यांत एकाद्या होडग्यांत सात वाजेतों नदीवर पांच सात मैलांचें वल्हवणें करों. तेथून परत येऊन संध्या