ती उणीव भरून काढण्यास पुढे येत आहेत ही फार समाधानाची गोष्ट आहे.
राजवाडे यांना मी प्रथम शके १८१७/१८ (इ. स. १८९५-९६) मध्ये पाहिलें. त्या वेळी मी लहान होतो आणि राजवाडे यांचे पहिल्या खंडाचें काम चालू होतें, त्यांचा पहिला खंड हा मी वाचलेला पहिला मराठी ग्रंथ होय. यांतील विषय कळण्याजोगें माझें वय नव्हते; तथापि त्यांनी आमचे इतिहासाची माहिती कोठ कोठे मिळेल त्या स्थळांची जी यादी (पहिला खंड, प्रस्तावना) दिली आहे, ती पाहून माझे मनावर विलक्षण परिणाम झाला आणि त्या वेळेपासून या कामाची गोडी मला लागली. हा अंकुर वाढीस लागून इ. स. १९०८ साली विजयानंद नाटकगृहांत जे ग्रंथकारांचे संमेलन भरलें होतें, त्यावेळी मी राजवाडे यांस घरीं- आमचे वडील राजवाडे यांचे सहाध्यायी होते- आग्रहाने बोलावून नेले. त्यानंतर १९९० त भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना राजवाडे यांनी मेहेंदळे यांच्या साह्यानें केली; किंबहुना त्या स्थापनेच्या दिवशीं- आषाढ शुद्ध १ शके १८३२ रोजी राजवाडे आमच्या घरूनच समेत गेले! असो.
अशा या गोष्टी आतां आठवणी झाल्या. त्याप्रमाणेच त्यांचे सहाध्यायी, सहकारी, विरोधक, शिष्य, मित्र, ग्रंथाभ्यासिक या सर्वांच्या आठवणीहि पुष्कळ अजून प्रसिद्ध व्हावयास पाहिजेत. तसेच त्यांचा इतरांशी व इतरांचा त्यांशी झालेला पत्रव्यवहार, त्यांचे अप्रसिद्ध लेख व संग्रह या सर्वांचे अवलोकन त्यांच्या चरित्र लेखकास अवश्य आहे. असा योग येईल तेव्हां राजवाडे
पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२