पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येईल आणि लिहावयासही पाहिजे. त्यांची खरी योग्यता कशांत होती त्याचीही चर्चा व्हावयास पाहिजे. ते नुसते इतिहास संशोधक नव्हते तर ते इतिहास तत्त्वविवेचकहि जबरे असून दिव्यदृष्टि आणि प्रज्ञावंत असे विचारस्त्रष्टेहि होते. ही त्यांची उच्च कोटी पटण्यासाठी त्यांचे चरित्राचें व लिखाणाचें सप्रमाण, सांगोपांग असें पुष्कळ विवेचन व्हावयास पाहिजे. पण तो प्रसंग अर्थातच हा प्रस्तावनेचा नव्हे. राजवाडे इतिहासक संशोधन मंडळानें हें कार्य हाती घेण्यास हवें आहे. असो. एवढें सांगून जो स्वराष्ट्राची भव्य स्मृती उजळण्यासाठी स्वतः सर्वस्वे झिजला त्या महापुरुषाचा एक नम्र पाइक म्हणून कर्तव्य बुद्धीनें लिहिलेले हे चार शब्द त्यांच्या चरित्राचें व कार्याचें सखोल बुद्धीनें मनन करण्याची प्रेरणा उत्पन्न करोत अशी प्रभूस प्रार्थना आहे.

पुणे
 दत्तो वामन पोतदार
जेष्ठ व. ३ शके १८५०