भाग ७ वा. कधीं तरी सिद्धीस जाईल या आशेनें परत हिंदुस्था- नांत न जातां पुण्यांतच तळ दिला; आणि तऱ्हेतऱ्हे- ची दाखवून व नानाप्रकारचे रंग* खेळवून श्रीमंतांची मर्जी पुनः संपादण्याचा दीर्घ प्रयत्न या पुरुषानें पुनः सुरू केला ! ! महादजी शिंद्याचा हा दुसरा प्रयोग मुदलींच सिद्धीस गेला नाहीं. कारण ह्या महत्पराक्रमी आणि मसलती पुरुषाला अकस्मात् नवज्वराची भावना हो- ऊन इ. स. १७९४ त फेब्रुवारीच्या १२ व्या ता- रखेला तो मृत्यु पावला. ह्या पुरुषानें आपल्या मागें आपल्या शौर्याची व दीर्घप्रयत्नाची अजरामर कीर्ति ठेविली. महादजीच्या मृत्यूमुळे पेशवाईतला एक मो- हरा हरपला व मराठ्यांची एक बाजू खचली असें सर्व लोक बोलूं लागले. महादजी शिंद्याच्या मार्गे दौलतराव शिंदा मुख्य झाला. शिंदा मेल्यावर दुसरा एक वीरमणि कांहीं दि- वसांनीं अस्तंगत झाला. तो कोणता ह्मणाल तर पर- शुरामभाऊचा रणबंधु व समकालीन हरिपंत फडके. ह्या शूर पुरुषाला पोटशुलाची व्यथा होऊन सिद्धटें-- कास श्रीगणपतीचे पायांजवळ कार्तिकमासीं त्यांचा अंत झाला. ह्यांच्या मरणामुळे पुण्यांतील लोक फार
- पेशव्याची बखर-सवाईमाधवराव-पान १६९-१७१.