पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/४३

हे पान प्रमाणित केलेले आहे.


मागणं लई नाही


 मार्च १९९५ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान विधानसभेची मुदत संपते. ९५ च्या सुरुवातीला कधीतरी राज्यातील निवडणुका होतील. मतदारांना ओळखपत्रे देण्याचा आग्रह मुख्य निवडणूक आयुक्तांनी धरला आहे. या किंवा अशा दुसऱ्या तांत्रिक अडचणी आल्या नाहीत, तर निवडणुका येत्या वर्षभरात पार पडतील.
 निवडणुकीचे वारे खेळू लागले आहेत. उत्तर प्रदेशात आपण का जिंकलो, हे न समजल्यामुळे आता सगळ्या देशात कोणत्याही राज्यात बहुजन समाज पक्षाचा मुख्यमंत्री आपण आणू शकतो अशा थाटात कांशीराम मुंबईला आले. पहिल्यांदा आले, ते जाहिरात फडकावून गेले, १६ जानेवारी रोजी तीन लाखांची सभा करतो म्हणून शडू ठोकून गेले, प्रत्यक्षात सभेला तेरा हजार लोक हजर असल्याची पोलिसी नोंद आहे. मंचावर कांशीराम आले, एवढेच नव्हे तर विनानिमंत्रणाचे विश्वनाथ प्रताप सिंगही आले. मंचावर बसून, समोरच्या समुदायाने दिलेल्या 'देश का नेता कैसा हो। कांशीराम जैसा हो।' अशा घोषणा त्यांना ऐकाव्या लागल्या.

 पुरोगामी लोकशाही आघाडी संपल्यात जमा आहे. त्यांना निवडणुकीची तयारी करणे आवश्यक नाही. याउलट, शरद पवार दोन वेगवेगळ्या निवडणुकांची तयारी करीत आहेत. आपण महाराष्ट्रात आलो, बाँबस्फोटांचा तपास केला, जातीय दंगली शमवल्या, भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता काहीतरी अफलातून कामगिरी करून दाखविली, नामांतर घडवून आणले, केंद्र शासनाकडून विकास मंडळाची घोषणा आज-उद्या होईलच, पुण्यातील राष्ट्रीय खेळांच्या झगमगाटात मिरवत बेळगावच्या प्रश्नालाही हात घालतो म्हटले, की पुढची निवडणूक महाराष्ट्रात काँग्रेस, पूर्वी कधी नव्हे इतक्या मताधिक्याने जिंकेल आणि आपण वाजतगाजत दिल्लीला जाऊ अशी शरद पावरांची एक योजना आहे. मध्यंतरीच्या काळात

पोशिंद्यांची लोकशाही / ४५