पान:प्रमाणशास्त्र.pdf/३०

हे पान प्रमाणित केलेले आहे.


अनुमानें.

ही मुदत सरतांच, दाव्याची पूर्णता झाली, असें कायदा निश्ययान्मक अनुमान करतो; पुढे जसजशी मुदत अधिक होत जात्ये, तसतसे जिन्नस घेणाराने पैसा चुकविल्याविषयींचे स्वाभाविक अनुमान बलवत्तर होत जाते; परंतु ने अनुमान अमुक दिवशीं निश्चयात्मक होते असे आपणास बुद्धि सांगत नाही, असे असतां, तीन वर्षानंतर किमतीचा फडशा झाला आहे, असे कायदा अनुमान करतो; परंतु ती मुदत भरण्यापूर्वी एक दिवस कायदा तसे अनुमान करीत नाही.

 ४७ . याममाणे जा अनुमानांस कायद्याचा नियमांवरून मनःकल्पित बळकटी किंवा किम्मत प्राप्त होत नाही, त्यांस,कायद्यावरून अनुमाने असें म्हणतात; आणि जांस अशी मनःकल्पित किम्मत नसूनजी मुकदम्यांतील घडलेल्या गोष्टींपासून मनावरील स्वाभाविक ग्रहांचा आश्रयाने असतात, त्यांस, स्वाभाविक अनुमानें, किंवा, घडलेल्या गोष्टींवरून अनुमाने, असे म्हणतात.

 ४८. जरी कायद्याची अनुमाने बहुधा बुद्धि वन्याय यांस अनुसरून असतात,तरी ती सार्वजनीन राजनीतीचा किंवा सोईचा सबबेने केलेली असतात,आणि सदरील उदाहरणांत सांगितले आहे त्याप्रमाणे दरचा व कोनाकोपन्यांत पडलेल्या गोष्टींची कठीण चौकशी करणे. न पडावी,असा बहुधा त्यांचा हेतु असतो.

 ४९. कायद्याचा अनुमानांचे वर्ग दोन केले आहेत; (१), निश्यायक अनुमान, म्हणजे जा