पान:प्रमाणशास्त्र.pdf/11

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुद्याचा तत्त्वाची शाबिती. ५. कित्येक सार्वजनीन गोष्टींविषयी शाबिती घेतल्यावांचून कोडतें त्या गोष्टी न्यायाधिकारनात्याने लक्षात ठेवितील. जसे,- या मुलकांतील कायदे करणा या मंडळीने केलेले कायदे, व इंग्लंडांतील पार्लमेंटू सभेचे सार्वजनीन कायदे, व आपले कामगार व वकील, व गव्हर्नर जनरल, व गव्हर्नर, व सरकार• चे दुसरे मोठे हुद्देदार, व सुप्रीम कोर्टाचे ( जज्ज ) न्यायाधीश; यांजला कोडते न्यायाधिकारनात्याने लक्षात ठेवितात. काळाचे विभाग, व भूगोलसंबंधी स्थलांचे विभाग, व देशांचा मर्यादा, व त्यांचा राजांची नांवें, इलकाब, व निशाणे, हीही न्यायाधिकारनात्याने लक्षात ठेवितात; आणि अशा कारणास्तव माहितीकरितां योग्य पुस्तकें किंवा दस्तऐवज कोडतांस पाहण्याची मुखत्यारी आहे, ( स० १८५५ चा आक्ट २, कलम २ तागाईत ६ पाह). या खेरीज आणखी काही सार्वजनीन गोष्टी इतक्या प्रख्यातीचा आहेत, की त्यांची शाबिती कोडते मागत नाहीत. मुद्याचा तत्त्वाची शाबिती झाली पाहिजे. ६. प्लीडिंगे आणि पुरावा यांचामध्ये मेळ असला पाहिजे; कोणी पक्षकाराने प्लीडिंगांमध्ये एका गाटीचा उपन्यास करून दुसरीची शाबिती करूं नये. उदाहरण;- पक्षकाराने साधारण, म्हणजे वारशासारख्या, हक्काविषयी दावा करून, मागाहून (१) जाबजबाब, उत्तर व प्रत्युत्तर, या सर्वांस प्लीडिंगे अतें म्हणतात. तपासनीस.