पान:प्रमाणशास्त्र.pdf/240

हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासयी लेख.

२३१

कमी भरवशाचा पुराव्याने फिरवू देणे हा अन्याय होईल.

 ४२८. एकादा करार लेखी असावा असे कायद्यावरून अवश्य नसल्यास, तो लेखी करार सही करून पुरा झाल्यानंतर त्या दस्तऐवजांतील ठराव पक्षकारांचा परस्परांचा सल्याने मुखजबानी फिरविले, असे दाखविण्याकरितां, तोंडचा पुरावा ग्राह्य आहे, असे दिसते. परंतु या ग्रंथाचे कलम ४१५ व ४१६ यांत ज्या मर्यादा सांगितल्या आहेत त्यांस हा नियम पात्र होय.

 ४२९. जर एकादा दस्तऐवज स्वतंत्र व्यवहाराविषयी नसून केवळ एकाद्या गोष्टीविषयी पर्यायाचे टिपण असेल, तर त्या गोष्टीची शाबिती इतर पुराव्याने करितां येते. जसें, एकाद्या ऐवजाचा भरण्या वेळी लेखी पावती दिलेली असली, तथापि तो पैका फेडला याबदल तोंडचा पुराव्याने शाबिती करितां येते. आणि मालाची मागणी मुखजबानी केली त्याच वेळी जरी लेखाने मागणी केली असेल, तथापि त्या मुखजबानी मागणीविषयी तोंडचा पुराव्याने शाबिती करितां येते आणि एकादे लग्न झाल्याबदल नोंदणी बुकांत दाखला असला, तथापि तें लग्न झालेलें खुद जांणी डोळ्यांनी पाहिले असेल अशा साक्षींनी त्या लग्नाची शाबिती करितां येते

 ४३०. कलम ४२८ यांत जो नियम सांगितला आहे त्याविषयी खाली लिहिलेली उदाहरणे "स्मिथकृत