हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वृद्धाश्रमात जगण्याच्या नामुष्की येते हे सांगणारी कथा आता खेडे व शहर यांच्या जीवन व जगण्याचा सीमारेषा जागतिकीकरणात अंधुक होत नाहीशा कशा होत आहेत हे समजावते. माईच्या रडण्याला शेरातल्या (शहरातल्या), गळक्या चावीची उपमा देऊन कथालेखकानं आपलं नागरी, ग्रामीण निरीक्षण एकवटून नोंदवलं आहे.
 ‘हनिमून' ही ‘कळ' मधील हास्यकथा होय. यातला बबन्या प्रा. लक्ष्मण देशपांडेच्या ‘व-हाड निघालं लंडनला' या एकपात्री प्रयोगातील बबन्याची आठवण करून देणारा. बबन्याचं लग्न होतं नि तो ऐकून असलेल्या 'हनिमून' ला निघतो. हनिमूनची फँटसी त्याला कर्जबाजारी करते तशी खोटं बोलून नवस करायचं सोंग करायला भाग पाडते. महाबळेश्वरला ‘हनिमून' साजरा करायला गेलेला बबन्यावर उपाशी दिवस कंठण्याची पाळी येतेच. शिवाय अज्ञानामुळे जे घरात फुकट झालं असतं ते पैसे देऊन हात दाखवून अवलक्षण करून घेण्याच्या पश्चात्तापानं बबन्याला करुण बनवतं. कथा शैलीच्या अंगाने अत्यंत यशस्वी कथा म्हणून नोंदवावी लागेल.
 ‘घुसमट' स्त्रीस्वभाव चित्रण करणारी कथा होय. चंद्रकांत खामकर यांनी सासू-सुनेच्या भांडणात मुलाच्या होणा-या सँडविचचं वर्णन, चित्रण संताच्या रूपात केलं आहे. सासू-सुनेच्या, आई-बायकोच्या अडकित्त्यात सापडलेला 'संता' म्हणजे पराधीन पुरुष. पण तोच शेवटी समुपदेशक होतो. आई-बायकोस समजावतो तेव्हा कुठे त्यास अन्न गोड लागू लागतं व तो सुखाची झोप घेऊ लागतो.
 कुस्ती ही ग्रामीण संस्कृतीची शान, मान, अभिमान तसेच जगण्याजागवण्याचं समर्थ साधन. आखाडा भरला नाही तर जत्रा रंगणार कशी? गावचा मल्ल सत्या कुस्ती जिंकून कसा फड मारतो याचं रोमांचकारी वर्णन करणारी ‘आखाडा' कथा म्हणजे गाव जत्रेचा ‘आँखो देखा हाल' होय.

 ‘कोंब' नकोशी ठरणाच्या स्त्री भ्रूण हत्येविषयी लोकप्रबोधन करणारी समस्या प्रधान कथा म्हणून समोर येते. यात आत्मकथेचा, शैलीचा द्रष्टा प्रयोग लेखकाने केला आहे. वारंवार स्त्री जीव जन्माला घालणा-या स्त्री दुःखाची ही जशी कथा, व्यथा आहे तशी नवा कोंब म्हणून जन्मणाच्या कन्येचा तो आक्रोशही होय. यात लेखक कवीही असल्याचे लक्षात येते ते कथेत वापरलेल्या स्वरचित दीर्घ कवितेमुळे. चंद्रकांत खामकरांच्यातला कथाकार एक समाज शिक्षक असल्याने त्याला समाजाची ‘कळ' अस्वस्थ

प्रशस्ती/१४८