पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/167

हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यावेळी बदलीच्या शक्यतेने ती परेशान झाली. कारण एकाचे दोन संसार होणार होते. तालुक्याचे गाव सोडून, पतीला सोडून दोन मुलांसह दूर राहणे तिच्या जीवावर येत होते.

 “पार्वती, आपल्याला काही कमी नाही. अगं, बोलून चालून मी तलाठी आहे. तुझ्या पैशाची मला गरज नाही. राजीनामा दे नोकरीचा!"

 तिला आपली नोकरी व त्याद्वारे प्राप्त होणारे आर्थिक स्वातंत्र्य सोडण्याची कल्पना मुळीच पसंत नव्हती. पण त्यावेळी कुटुंबस्वास्थ्यासाठी बदलीही नको होती.

 तिने थोडा विचार केला. या समस्येतून कसा मार्ग काढावा? यासाठी आपल्या कर्मचारी सहकाच्यांशी चर्चा केली. तेव्हा एक मार्ग सापडला. ती नवऱ्याला म्हणाली, “तुमचे तहसीलदार सैन्यात कॅप्टन होते. त्यांना सांगून आमच्या एन.सी.सी.च्या कमांडिंग ऑफिसरला सांगितले व तशी क्रीडाविभागाच्या विभागीय उपसंचालकांना शिफारस केली तर मला इथेच रिक्तपदी, बढ़तीनंतरही ठेवता येईल. पती, पत्नी दोघेही शासकीय सेवेत असतील तर एका जागी राहू शकतात, असे शासनाचे धोरण आहेच." आणि झालंहीं तसंच. तहसीलदारांनी तिचे काम चुटकीसरशी केले.

 त्यानंतर आठ वर्षे ती त्याच गावी होती आणि अचानक तिची अकोला येथे बदली करण्यात आली. खरं तर, चारसहा महिन्यात मुख्यलिपिकपदी बढती मिळण्याची शक्यता होती. मुख्यलिपिकाचे पद मिळत असेल तर तिनं बदलीची मानसिक तयारी ठेवली होती.

 तरीही शंभर किलोमीटर अंतरावरील अकोला शहरात बदलीची बातमी धक्कादायक होती! नव्याने बदलून आलेल्या कर्नल वाघचा हात त्यामागे असणार याची तिला शंका, नव्हे खात्री, होती. 'ब्लडी सिव्हिलियन' ही त्यांच्या तोंडात कायम बसलेली शिवी.

 "यू वर्थलेस लेडी क्रीचर, युवर प्लेस इज नॉट इन द ऑफिस" असे एकदा वाघ म्हणाले, तेव्हा ती उसळली होती.

 “सर, कामात चुकत असेल तर मी कितीही बोललेलं सहन करीन. पण असे बायकांबद्दलचे उद्गार अपमानास्पद वाटतात. आता समतेचा जमाना आलाय, आताशी तर सैन्यातही स्त्रिया आहेत." तेव्हा चवताळून त्यांनी सैनिकी भाषेत तिचा उद्धार केला. पार्वतीनेही मग न राहवून प्रतिवाद केला.

 त्या दिवसापासून तिचे त्रासपर्व सुरू झालं. तिच्या प्रत्येक कामात चुका काढणे, तिच्या ‘नोटींग, ‘ड्राफ्टिंग', वर 'पुअर -नॉट सॅटिस्फॅक्टरी', 'अनवर्दी

१६६ । प्रशासननामा