पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/79

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आदेशानं मानेंचा रॉकेल परवाना निलंबित करण्यात आला. निलंबनाचे आदेश घेताना माने चंद्रकांतला स्पष्ट कबुली देत म्हणाला,

 ‘सर, आजवर मला कोणी हात लावायची हिंमत केली नव्हती. पण एक सांगतो, जितका मी दोषी आहे, त्याच्या दसपट बद्रीप्रसाद दोषी आहे. पण तुम्हाला त्याच्याविरुद्ध पुरावा सापडणं शक्य नाही. कारण पाहुण्या हाती साप मारावा तसा माझ्या नावेच नव्हे, तर बऱ्याच सब एजंटच्या नावे तोच काळाबाजार करतो, अडकतो मात्र आम्ही.'

 ‘मला त्याची तुम्ही मोडस ऑपरंडी-कार्यपद्धती सांगितली तर चौकशीच्या वेळी तुमचा सहानुभूतीने विचार करता येईल.

 मधाचं बोट लावीत चंद्रकांतनं मानेला बोलतं करण्याचा प्रयत्न केला.

 ‘सर, मी सहीपुरता साक्षर आहे. मला लिखापढी कळत नाही आणि ही बद्रीप्रसाद त्यात उस्ताद आहे.' माने म्हणाला, 'पण त्याच्यापर्यंत जर कुणी पोचू शकत असेल तर ते तुम्हीच. त्याला जरूर पकडा व शिक्षा करा सर!'

 चंद्रकांत दिवसभर विचार करत होता तो बद्रीप्रसादचा! हिंदुस्तान पेट्रोलियम् कंपनीचा जिल्हा एजंट होता. त्यांच्या मार्केटिंग अधिकाऱ्यांशी बोलला; पण तो चंद्रकांतच्या ताकास तूर लावू देत नव्हता. तो बद्रीप्रसाद व इतर एजंटच्या रॅकेट मध्ये सामील असणार.

 माने प्रकरणाचा शहराच्या रॉकेल टंचाईवर काही प्रमाणात का होईना अनुकुल परिणाम झाला होता. सर्व ठोक एजंट सावध झाले होते. त्यांनी बऱ्याच प्रमाणात रॉकेलचा पुरवठा, काळाबाजार करणे कमी केले होते. शहरातील रॉकेल टंचाई जवळपास संपुष्टात आली होती. आयुक्तांनी त्याचं अभिनंदन केलं होतं; चंद्रकांत समाधानी नव्हता. कारण ही तात्पुरती जीत होती. अजूनही 'बडी मछली' कायद्याच्या जाळ्यात गवसली नव्हती.

 माने प्रकरणात त्याच्या इतकाच दोषी असलेला बद्रीप्रसाद अजूनही पुराव्याअभावी मोकळा होता. त्याचं रेकॉर्ड स्वच्छ होतं. त्यानं मानेला दोन टँकर्स दिल्याची कागदोपत्री नोंद होती व ते मिळाल्याबद्दल मानेंची स्वाक्षरी होती.

 'होय, ती सही माझी आहे; पण केवळ पाच हजार देऊन त्यांनी माझी सही घेतली व स्वत: त्यानं दोन टॅकर्सचा काळाबाजार करून किमान पन्नास हजाराची चांदी केली असणार.

 मानेचं हे वाक्य त्याला बोचत होतं आणि बद्रीप्रसादला पकडून, शिकवल्याखेरीज खऱ्या अर्थानं या मोठ्या माशाला वेसण बसणार नव्हती की शहर व जिल्ह्यातील रॉकेल टंचाई संपणार नव्हती. पण बद्रीप्रसादविरुद्ध काही

७८ । प्रशासननामा