पान:फुलाचा प्रयोग.djvu/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

  " त्यांचा राग मी शांत करीन. " ती म्हणाली.
 शिपायाने ते दार उघडले. ती फाशी जाणाऱ्याकडे पाहात राहिली. तिला काही बोलवेना. तिचे डोळे भरून आले. तिचे हृदय भरून आले.
 " कशासाठी तुम्ही आल्यात ?" फुलाने विचारले.
 " तुम्हांला पाहाण्यासाठी."
 " माणसाला काय पाहायचे ? "
 " तुम्ही उद्या जग सोडून जाणार. तुमच्याजवळ दोन गोड शब्द बोलावे म्हणून मी आल्ये आहे.
 " जे जगतात त्यांच्याजवळ गोड बोला. मरणान्याजवळ गोड बोलण्यात काय अर्थ ? तो तर मरणार आहे. जगणान्यांना आनंद द्या."
 " तुम्हांला मरणाचं भय नाही वाटत? तुमच्या खिडकीसमोर मुद्दाम तो वधस्तंभ उभारला आहे, तुम्हांला सारखा दिसावा म्हणून, तुम्हांला वाईट नाही वाटत ? तुम्ही तर त्या खिडकीतून हसत पाहात होतेत !"
 " वाईट करणान्याला मरणाचे भय. मी कधीही वाईट गोष्ट केली नाही. मी फुले फुलविली. कळ्या फुलविल्या. त्यांचे रंग वाढवले, गंध वाढवले. मला कसले भय ? आता देवाच्या नंदनवनात काम करीन. पृथ्वीवरचा हा फुलमाळी देवाला आवडला असेल म्हणून तो नेत असेल."
 "माझं नाव तुम्हांला माहीत आहे ? "
 " नाही."
 " माझे नाव कळी."
 " किती गोड नाव !
"  परंतु कोण मला फुलवणार ?
 " भेटेल योग्य असा माळी. "
 " योग्य माळी भेटला. परंतु तो तर चालला !  देवाची दुनिया ओस नाहो. "
 मरणाला मिठी मारण्याचे धैर्य तुम्हाला कोणी दिले ? कोणी शिकविले ? "
 "ह्या लहानशा पुस्तकाने."
 " काय त्याचे नाव ?"
 " श्रीमद्भगवद्गीता."

'२० फुलाचा प्रयोग'