पान:फुलाचा प्रयोग.djvu/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 “ फाशी जाणान्याचा मला स्पर्श ? दूर हो ! " पुन्हा साहेब ओरडले.
 " बाबा, त्यांनी तुमची जखम बांधली. डोक्यावर थंड पाण्याची धार धरली. तुम्ही त्यांना मारायला धावलेत, परंतु त्यांची तुम्हाला प्रेम दिले. अशांना आणखी शिव्या का द्यायच्या? चला बाबा, मी हात धरून तुम्हाला नेते, उठा. " कळी म्हणालो.
 कैद्याकडे बघत व पित्याला धरून कळी निघून गेली. फुला तिच्याकडे बघत होता. तो दिसेनाशी झाली. फुलाने आजपर्यंत लाखो कळ्या फुलविल्या होत्या. त्यांच्यावर त्याने प्रेमाचे प्रयोग केले होते. त्या कळ्यांचे रंग त्याने अधिक खुलविले होते, त्यांच्या गंधात भर घातली होती. कळ्यांचे आकार त्याने बदलले. त्यांच्या पाकळ्या मोठ्या केल्या. परंतु अशी कळी त्याला कधी भेटली नव्हती. अशी कळी त्याने : कधी फुलावली नव्हती.
 हा कळी अजून फुलली नव्हती. ह्या कळीच्या जीवनात किती तरी रंग ओतता आले असते. गंध भरता आले असते. ह्या कळीला जर शिक्षण दिले तर ? ह्या कळीने सुंदर विचार ऐकले तर ? ह्या कळीला निर्मल व प्रेमळ सहवास घडला तर ? मी जगलो असतो, तर ह्या मानवी कळीवर प्रयोग केले असते. तुरुंगात राहून प्रयोग केले असते.






फुलाला फाशीची शिक्षा * २३