पान:फुलाचा प्रयोग.djvu/२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लोकांना जसे वळवावे तसे ते वळतात. अग्नीने संदर स्वयंपाक करता येतो, आगही लावता येते. लोकांना शांत ठेवता येते, त्यांना प्रक्षुब्धही करता येते. पाणी शांत असते, परंतु जोराचा वारा सुटला तर तच पाणो प्रचंड लाटांचे रूप धारण करते. मोठमोठ्या बोटीही मग त्या लाटांसमोर टिकू शकत नाहीत. त्याप्रमाणे शांत राहाणारी जनता कोणी एखाद्या गोष्टीचा तुफानी प्रचार केला तर खवळते. ती मग आवरता येत नाही.
 राजधानीतील लोक त्या दोन प्रधानांविरुद्ध फारच विथरले. एके दिवशी सायंकाळी विराट सभा झाली. द्वेषाची आग पाखडणारी भाषणे झाली. प्रधानांच्या घरांकडे त्यांनी मोर्चा वळवला. "मारून टाका हे प्रधान ; स्वार्थी बेटे ; देशभक्त म्हणून मिरवतात ; तुकडेतुकडे करा. आग लावा त्यांच्या बंगल्यांना." असे ओरडत प्रक्षुब्ध जनता निघाली.
 एक प्रधान घरात सापडला. दुसरा कोठे आहे ? परंतु आहे त्याची तरी उडवा चटणी. जो प्रधान सापडला त्याला लोकांनी फरफरा ओढोत आणले. कोणी दगड मारले. कोणी ढिपळे मारली. कोणो हात तोडला. कोणी पाय उडवला. हाल-हाल करून त्या प्रधानाला मारण्यात आले. त्याचे डोके भाल्यावर रोवन ते मिरवण्यात आले. " देशद्रोह्यांना अमे शासन हवे. स्वार्थी लोकांना हे बक्षीस मिळते." असे गर्जत लोक गेले.
 परंतु तो दूसरा प्रधान कोठे आहे ? राजधानीतील काही विचारी माणसांनी एक पत्रक काढले. "एका प्रधानाचा लोकांनी सोक्षमोक्ष लावला. आता दुसऱ्याचा सूड घेण्यास ते अधीर झाले आहेत. परंतु हा खरा मार्ग नव्हे. प्रधानांची न्यायासनासमोर चौकशी होऊ दे. जर ते दोषी ठरले, त्यांच्यावर काही आरोप सिद्ध झाले, तर त्यांना होऊ दे शिक्षा. आता दुसन्या प्रधानास तरी न्यायासनासमोर उभे करा."
 "होय, हे बरोबर आहे. ह्या दुसऱ्याची चौकशीच करू या. सारी कृष्णकृत्ये बाहेर येऊ देत. त्यांचे इतर साथीदार कोण आहेत हेही कळेल. त्यांचाही नायनाट करता येईल," असे लोक म्हणू लागले. हे दुसरे प्रधान कोठे पळून जाऊ नयेत म्हणून त्यांना तुरुंगात ठेवण्यात यावे व न्यायाधिशांनी त्यांची चौकशी लवकर करावी अशाही मागण्या लोकांनी सभेतून केल्या.

८: फुलाचा प्रयोग