या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
" तुला सून आणली आहे. चांगली आहे की नाही सून ?"
" तो लफंग्या बसला आहे तुरुंगात. त्याला मी जावई करणार होतो.
देवाने वाचविले. कळोचे नशीब थोर ! " म्हातारा म्हणाला.
ती सारी फुलाच्या घरी आली. फुला व कळी फुले फुलवू लागलो.
त्यांचा जोडा फार शोभे. गावातील म्हातारी माणसे त्यांचे कौतुक करीत.
फुलाच्या बागेचे ढब्बूसाहेब रक्षण करी. लहान मुले-मुली फुले तोडायला
येत. त्यांना तो दटावी. परंतु शेवटी फुले देई.
कळी व फुला ह्यांचा संसार सुखाचा झाला. त्यांना जैसे सुख मिळाले
तसे तुम्हा सर्वांस मिळो ! संपली ही कथा. हरो सर्वांची व्यथा.
संपली फुलाची गोष्ट, होवोत वाचणारे संतुष्ट...
* * *
५२ * फुलाचा प्रयोग