पान:फुलाचा प्रयोग.djvu/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अस माधा न

  • * * * * * * **

परंतु सर्वज्ञ माधव आज असमाधानी होता. इतके वर्षांत असे अन त्याला कधी वाटले नव्हते. तो नेहमी पुस्तकांत रंगलेला असावयाचा. परंतु आज पुस्तके निःसार वाटत. होती. जी पुस्तके वाचता वाचता इतकी वर्षे तो घामाघूम झाला, त्या पुस्तकांत काडीमात्र राम नाही असे आज त्याला वाटले. तो शून्य दृष्टीने दिवाणखान्यातील त्या ज्ञानभांडाराकडे बघत होता. शेवटी तो उठला. तो खिडकीजवळ गेला. खिडकी उघडावी असे त्याला वाटले. परंतु ती खिडकी उघडेना. बिजागरे गंजून गेली होती. बोलट गंजला होता. शेवटी सर्व शक्ती एकवटून त्याने बोलट ओढला.. खिडकी उघडली. बाहेरच्या शुभ्र चांदण्याचा प्रकाश एक दिवाणखान्यात भरला. सूर्याच्या किरणांना, चंद्रकिरणांना आजपर्यंत तो दिवाणखाना बंद होता. चंद्राच्या प्रकाशाला त्यात शिरावयास आज आनंद होत होता. आज पौर्णिमा होती, पूर्णचंद्र अनंत अशा काळ्या- सावळ्या आकाशात शोभत होता. मध्यरात्र झाली होती. सर्वत्र सामसूम होते. मध्येच एखादे कुत्रे भुंके. वटवाघूळ फडफड करी ; माधव त् चंद्रप्रकाशाकडे पाहात राहिला. किती तरी वर्षांत चांदणे त्याने पाहिले नव्हते. सर्व पृथ्वी दुधात न्हाल्यासारखी दिसत होती. माधव उभा होता. अनिमिष नेत्रांनी तो चंद्रप्रकाश तो पीत होता.. तेथे खिडकीत त्याची तंद्री लागली. तो विचारमग्न झाला. तो मनात म्हणाला, “ मी इतकी वर्षे सर्वं विद्यांचा अभ्यास करीत आहे. परंतु मला काय मिळाले ? विश्वाचे रहस्य उलगडले का ? चंद्र, सूर्य, तारे ५८ फुलाचा प्रयोग