पान:फुलाचा प्रयोग.djvu/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जेवणे खाणे झालो. ती मुलगी पुन्हा गळ्यात तो हार घालून बसलो. " किती ग सुंदर हार, कसा शोभतो माझ्या गळ्याला ! त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. खरेच का प्रेम असेल ? प्रेम एकदम जडते म्हणतात. मी त्यांच्यावर रागावले. परंतु पुन्हा मीच त्यांच्याकडे वळून पाहिले. त्यांच्याजवळ हार असतील हे का मला माहीत होते ? परंतु पाहिले खरे. माझे का त्यांच्यावर प्रेम आहे ? गोड बोलतात, गोड दिसतात आणि श्रीमंत का आहेत ते ? परंतु श्रीमंती काय करायची ? प्रेमाची श्रीमंती आधी हवी. मला एक दोन दागिने आवडतात. परंतु ते न मिळाले म्हणून काय झाले ? दागिन्यांशिवायही मी सुंदर दिसते. सौंदर्याचा दागिना देवाने मला दिला आहे! तेवढा पुरे. केव्हा होईल संध्याकाळ ? अजून सावल्या तिथेच आहेत. सूर्य का आज आळसावला आहे ? जा रे सूर्या झपझप खाली."
 असे ती मनात म्हणतात. होतो. कल्पनेच्या राज्यात, प्रेमाच्या राज्यात गेली होती. इतक्यात आईने दळायला हाक मारली. ती गेली. मायलेकी दळीत होत्या. पायली दोड पायली दळण होते. केव्हा संपणार दळण ?हे हात का धुणी धुण्यासाठी, दळणकांडण करण्यासाठीच जन्मले आहेत ?" असे ती मुलगी मनात म्हणत होती.
 " कंटाळलीस तर जा उठून फुरंगटायला काय झाले ? तिन्ही त्रिकाळ खायला मात्र हवं. जा हो. मी एकटी दळन. " आई म्हणाली.
 "पण जाते ओढीत का नाही ? आई, तू बोलतेस. भाऊ घरी आला म्हणजे तो बोलतोc जाते ओढीत का नाही ? आई, तू बोलतेस. भाऊ घरी आला म्हणजे तो बोलतो. मी तुम्हांला नकोशी का झाले आहे ? का सारी मला बोलता ? " ती स्फुंदत म्हणाली.
 " नीट वागले म्हणजे कोणी बोलणार नाही. आता लहान नाहीस तू. दोन लेकरांची आई शोभशील. तरी पोरकटपणा जात नाही. असल्या खुळसंतानाला कोण करून घेईल बायको ?!"
 " नाही कोणी पत्करले तर नाही. मी अशीच राहीन. "
 " म्हणे अशीच राहीन. लाज नाही वाटत ? थोबाड फोडायला हवं.
 संपले एकदाचे दळण. सायंकाळ होत आली. ती मुलगी बाहेर पडली. ती त्या बागेत गेली. तिने इकडे तिकडे पाहिले. तो दूर गुलाबांच्या ताटव्याजवळ तो उभा होता. तो तिचा श्रीमंत प्रियकर तेथे होता. ती

मधुरीची भेट ७३