पान:फुलाचा प्रयोग.djvu/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " अरे जा माहीत आहे. घरोघर मातीच्याच चुली."
 “ घरोघर असतील. परंतु माझे घर अपवाद आहे. माझी बहीण तशी नाही. ती धुतल्या तादळासारखी आहे."
 " तू घरी नसतोस तिचे थर पाहायला. तू कामावर असतोस व ती प्रियकराला मिठ्या मारीत असत. घरी आता आईचीही अडचण नाही."
 " तोड सांभाळून बाल, माझ्या बहिणीची अब्रू - तिचे का धिंडवडे माडले आहेस ?" तुझ्याबहिणीची मात्र अब्रू इतर मायबहिणीवर टाका करतास तेव्हा रे ! तव्हा कसे तोंड चुरचुर चालतं तुझे ?
 अस भडत त जात होते. इतक्यात सेतान व माधव तिकडून आले. बाहेर काळोख पडत होता. मधुराचे घर जवळ होते. सैतान माधवला म्हणाला, “हाच तिचा भाऊ. मार सोटा, काढ काटा, हाण. "
 " मला नाही धेयँ. " माघव म्हणाला. " भितुरडा. " असे म्हणून सैतानान मधुराच्या भावाच्या डाक्यात सोटा हाणला.
 " अर, हा बघ तुझ्या बहिणीचा जार. " बरोबरचा कामगार म्हणाला.
 परंतु भाऊ खाली पडला होता. सैतान व माधव अंधारातून पसार झालं. भावाची किकाळी मधुरीनं घरातून ऐकली. ती दिवा घेऊन आली,तो भाऊ रस्त्यात पडल्ला. डोक्यातून भळभळ रक्त वाहात होते. ती भावाचे डोक मांडीवर घेऊन बसली.
 " यथ रस्त्यात कोठे बसतस ? त्याला घरी नेऊ. " शेजारी म्हणाले.
 भावाला घरा नण्यात आले. मधुरी वारा घालीत होती. डाक्याला तिने फडके बांधल. “भाऊ, भाऊ, ती हाका मारीत होती. तिला रडू आले. बराच वेळ झाला. भावाने डोळे उघडले. जवळ बहीण होती.
 " तू दूर हो. माझ्या अंगाला हात लावू नकोस. तू पापी आहेस. दुष्ट आहेस. तू व्यभिचारिणी आहेस. वेश्या आहेस. हो दूर. मरताना तरी पापी माणसाचे दर्शन नका. तुझ्या माकडचेष्टांसाठी आईला विष देऊन मारलंस. तु तुझ्या भावाच्या डाक्यात आज साटा मारवलास. तू डाकीण आहेस. हो दूर. नको लावू हात. " भाऊ त्वेषाने म्हणाला.
 " भाऊ, नको रे असे बोलू. मी नाही हो अपराधी. मी का वेश्या ? मी फक्त एकाला प्रेम दिले. बघ हे हृदय फाडून, बहिणीला वाटेल ते कसे

८० * फुलाचा प्रयोग