पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/६

हे पान प्रमाणित केलेले आहे.

चैतन्य

ग्रामीण महिला, युवक व बाल विकास संस्था

० मुख्य कार्यालय: मु. राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे.- ४१०५०५. (०२२३५) २३१७६
• संपर्क कार्यालय : ७८७, डेक्कन जिमखाना, हॉटेल रविराजच्या मागे, भांडारकर रोड,पुणे. - ४११ ००४.
(०२०) ५६६०५८१, ५६७२५९१ फॅक्स : (०२०) ५६७०८३८
ई-मेल : chaitanya_pune@yahoo.co.in
अभिनंदन

 ज्ञान प्रबोधिनीतील अभ्यासू व प्रयोगशील वातावरणात वाढलेल्या कार्यकर्त्यांच्या कामाची झलक या प्रशिक्षण पुस्तिकेतून दिसते. स्वयंसाहाय्यता समूह चळवळ बळकट करण्यामध्ये सभासद, संघटिका आणि गटप्रमुखांची हिशोबाबद्दलची समज अतिशय महत्त्वाची ठरते. चोख हिशोब करता येणं आणि करून घेता येणं हे कौशल्य स्वयंसाहाय्यता समूह चळवळीचा कणा आहे. वेगानं वाढणाया गटांची संख्या बघता त्याची नितांत गरजही आहे.
 या प्रशिक्षण पुस्तकाची निर्मिती खूप प्रेरणादायी आहे. प्रशिक्षण साहित्य बनवण्याच्या तंत्रातले सर्व टप्पे हे पुस्तक तयार करताना करण्यात आले आहेत. प्रथम प्रशिक्षणाची गरज शोधणे, पाठ तयार करणे, ते सोडवताना जिथे अडेल तिथे मार्ग काढणे, साधनं विकसित करणे, ती तपासणे, पुन्हा दुरूस्त करणे ही प्रक्रिया सातत्याने करणा-या स्वयंप्रेरित प्रशिक्षकांचा गट या संपूर्ण विषयासोबत एकरूप झालेला आहे.
 'चालना'मध्ये प्रशिक्षण गट विकसित होण्याच्या मूळ कल्पनेस सुरुवात झाली. ती सुवर्णा, बागेश्री व त्यांच्या सहकारी गटाने प्रत्यक्षात आणली. त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
 नाबार्डने या कामाला प्रोत्साहन दिले आहेच, चैतन्य महिला प्रशिक्षण व संसाधन केंद्र या पद्धतीचा वापर व प्रसार करण्यात निश्चितच सहभागी होईल.

डॉ. सुधाताई कोठारी

अध्यक्षा,

चैतन्य महिला संसाधन व प्रशिक्षण केंद्र

‘संगम', वाडा रोड,

राजगुरूनगर