पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लष्करातील सहकार चळवळीचा पहिला 'प्रयोग'
 नानासाहेब दुसऱ्या पलटणीचे कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत असताना सयाजीराव महाराजांनी बडोदा लष्कराच्या प्रत्येक पलटणीमध्ये सहकारी वखार ( Cooperative Stores) स्थापन करण्याचा आदेश दिला. तत्कालीन जनरल गॉर्डन यांनी सर्व कमांडिंग ऑफिसरना सहकारी वखारीची कल्पना समजवून सांगितली; परंतु या योजनेची अंमलबजावणी करण्यास कोणीही तयार झाले नाही. जनरल गॉर्डन आणि मिलिटरी सेक्रेटरी पाडगावकर यांनी नानासाहेबांना त्यांच्या अखत्यारीतील पलटणीमध्ये सहकारी वखार काढावी असा आग्रह केला. नानासाहेबांनी त्यांचा हा आग्रह मान्य केला. संस्थानचे अधिकारी आणि सहकार चळवळीचे जाणकार समर्थ यांच्याकडून नानासाहेबांनी आवश्यक ती माहिती घेऊन आपल्या पलटणीमध्ये सहकारी वखारीची स्थापना केली.
 पलटणीमधील प्रत्येक शिपायाकडून एक रुपया भागभांडवल गोळा करण्यात आले, तर अधिकारी व्यक्तींकडून ठराविक रक्कम घेण्यात आली. सहकारी वखारीसाठीचे नियम तयार करून त्यांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली. पहिल्या महिन्यात केवळ घाऊक बाजारात धान्य खरेदी करून बाजारभावाप्रमाणे विकण्यात आले. काही दिवसांनी या वखारीत तेल, तूप, साखर, गुळ, मीठ, मसाला, पीठ इ. किरकोळ वस्तूही विक्रीस ठेवण्यात

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / २४