पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धारी पलटणीचा कायापालट
 १९०८ मध्ये फौज खात्यात ब्रिगेड मेजरचे स्वतंत्र पद निर्माण करण्यात आले. जनरल गॉर्डन यांनी नानासाहेबांची या पदासाठी शिफारस केली; परंतु 'मिलिटरी सेक्रेटरी पाडगावकर हे नानासाहेबांचे स्नेही असल्यामुळे ही शिफारस करण्यात आली' असे काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. अखेर सयाजीराव महाराजांनी या संदर्भात निर्णय देताना ब्रिगेड मेजरच्या पदावर कॅप्टन हार्डी यांची नेमणूक करून नानासाहेबांना धारी पलटणीवर अॅक्टिंग कॅप्टन म्हणून जाण्याचा आदेश दिला. अमरेली प्रांतातील धारी नावाच्या सरहद्दीवरील तालुक्याच्या गावामध्ये गीर जंगलात बडोदा सरकारची एक पलटण ठेवण्यात आली होती. एका अर्थाने आपली बडोद्याहून उचलबांगडी करण्यात आल्याची भावना नानासाहेबांच्या मनात निर्माण झाली. तसेच महाराज शिंदेवर नाराज झाल्यामुळे ही बदली करण्यात आल्याची अफवा बडोद्यात पसरली होती. अनेक व्यक्तींनी बदली तहकूब करण्यासाठी महाराजांची भेट घेण्याचा सल्ला नानासाहेबांना दिला; परंतु आज्ञाधारक नानासाहेबांनी हा सल्ला नाकारत महाराजांच्या हुकुमानुसार धारीस जाणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

 धारीस जाण्याआधी नानासाहेब महाराजांना भेटण्यासाठी राजवाड्यावर गेले. त्यावेळी नानासाहेबांची धारीला बदली का केली आहे आणि तेथे गेल्यानंतर त्यांनी कसे वागणे अपेक्षित

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / २७