पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांच्या सोयीसाठी महाराजांनी त्यांची धारीस बदली करून नानासाहेबांची बडोद्यात नेमणूक केली. स्वतः होऊन सरकारकडे कधीही बदली मागायची नाही हा नानासाहेबांचा निश्चय होता. सुदैवाने सयाजीरावांनी केलेली त्यांची बदली पथ्यावरच पडली. १४ मे १९१० रोजी नानासाहेबांनी बडोद्यातील फर्स्ट कॅव्हलरीचा चार्ज घेतला.
‘बडोदा डिसिप्लीन अॅक्ट'मध्ये सुधारणा

 जनरल बर्डवूड यांच्या शिफारशीवरून सयाजीराव महाराजांनी नानासाहेबांना ब्रिगेड मेजरच्या पदावर बढती दिली. नानासाहेब ब्रिगेड मेजर म्हणून कार्यरत असताना 'बडोदा डिसिप्लीन अॅक्ट' दुरुस्त 'करण्याबाबतची चर्चा सुरू झाली. तेव्हा नानासाहेबांनी उत्स्फूर्तपणे ही जबाबदारी स्वीकारली. त्यांनी केशवराव सावंतांना या कामात मदतीसाठी घेतले. दोन महिन्यांच्या परिश्रमाने नानासाहेबांनी केशवरावांच्या मदतीने हा कायदा नव्याने इंग्रजीमध्ये तयार केला. हा कायदा वाचल्यानंतर प्रभावित झालेल्या जनरल बर्डवूड यांनी 'युरोपियन ऑफिसरासही असा कायदा तयार करता आला नसता' अशा शब्दांत दोघांचे कौतुक केले. हा कायदा संमतीसाठी सरकारकडे पाठवताना बर्डवूड लिहितात, “Both these officers deserves the highest praise for the keep interest they manifested in this work of revision. They have removed a great want felt by the Department of placing on records the

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ३०