पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराजांकडे ए.डी.सी. म्हणून काम करणारा व्यक्ती 'Master of All Trades' प्रमाणे अष्टपैलू असणे आवश्यक असल्याचे मत नानासाहेबांनी मांडले आहे. सयाजीरावांच्या ए.डी. सी.बद्दल अन्य एका महाराजांनी काढलेले उद्दार नानासाहेबांनी आपल्या आत्मचरित्रात नोंदवले आहे. नानासाहेब लिहितात, “महाराजांजवळ राहून ए. डी. सी. या नात्याने काम केलेला अंमलदार वाटेल त्या महत्त्वाच्या सरकारी कामास उपयोगी व लायक होतो. एका महाराजांनी एकदा मजजवळ जेवताना असे उद्गार काढले की, “सयाजीराव महाराजांच्या तैनातीत व तालमीत तयार झालेला ए. डी. सी. आमच्यासारख्या लहान संस्थानांत दिवाणाचे काम करण्यास लायक होईल, असे त्याचे शिक्षण असते.” या म्हणण्यात फारशी अतिशयोक्ती नाही. महाराजांच्या तैनातीत राहून काम केलेले ए. डी. सी. आज नायबदिवाण, जनरल, कर्नल, मेजर, सुभे व नायब सुभ्यासारख्या मोठ्या दर्जावर आहेत व त्या ठिकाणी ते चांगली कामे करीत आहेत."
 लेफ्टनंट दर्जाच्या सर्व अंमलदारांनी आळीपाळीने ए.डी.सी. ची जबाबदारी पार पाडण्याची प्रथा १९०५ पर्यंत सुरू होती. रोज येणाऱ्या निरनिराळ्या अंमलदारांना आधीच्या कामाची माहिती नसल्यामुळे अडचणी निर्माण होत. हा गोंधळ टाळण्यासाठी महाराजांनी तीन नवीन अंमलदारांची कायमस्वरूपी ए.डी.

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ३७