पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोदा फौजेचे पहिले भारतीय जनरल
 १९२० च्या दरम्यान बडोदा, कडी आणि अमरेली प्रांतात होणाऱ्या लुटालुटीचा तपास करून योग्य उपाय सुचवण्यासाठी महाराजांनी 'डेकॉयटी कमिशन'ची स्थापना केली. पोलीस कमिशनर मेजर हॉगसन यांच्या अध्यक्षतेखालील या कमिशनमध्ये नानासाहेब, माजी पोलीस कमिशनर बाबूराव चव्हाण आणि वकील गुणवंतराव मुजुमदार यांचा समावेश होता. कथित लुटालुटीच्या तपासाकरिता कमिशनच्या बडोदा, पेटलाद, पाटण, अमरेली इ. ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. या बैठकांदरम्यान पोलीस बंदोबस्तासंबंधी अनेक त्रुटी उघडकी आल्या. कमिशनचे अध्यक्ष हे स्वतःच पोलीस कमिशनर असल्यामुळे अनेक बाबींचा त्यांनी स्वतःच्या अधिकारात बंदोबस्त केला, तर आवश्यक त्या बाबी वरिष्ठांच्या लक्षात आणून देऊन योग्य ते आदेश द्यायला लावले. या कमिशनचा अहवाल बऱ्याच दिवसानंतर सयाजीराव महाराजांना सादर करण्यात आला. या कमिशनमध्ये काम केल्यामुळे नानासाहेबांना पोलिसांच्या अंतर्व्यवस्थेसंबंधी बरीच माहिती मिळाली.
 कर्नल डिव्हिन सेवानिवृत्ती झाल्यानंतर १० नोव्हेंबर १९२२ रोजी नानासाहेबांची अॅक्टिंग जनरल पदी नियुक्ती करण्यात आली. बडोदा फौजेत सेनापती आणि जनरल अशी दोन अधिकाराची

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ४१