पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आज्ञा सयाजीरावांनी केली. त्यानुसार नानासाहेब ऐनवेळी या बैठकीस उपस्थित राहिले.
 बडोदा फौजेतून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि शिपायांना पगाराच्या मानाने कमी पेन्शन मिळत असल्याची ओरड सातत्याने होत असे. बडोद्याच्या अॅक्टिंग जनरलपदी निवड झाल्यानंतर नानासाहेबांनी या प्रश्नात लक्ष घातले. अधिकारी आणि शिपायांच्या पेन्शनसंदर्भातील नवीन योजना तयार करून नानासाहेबांनी महाराजांसमोर मांडली. ही योजना अतिशय उत्कृष्ट असल्याने सयाजीरावांनी १९२५ मध्ये परदेश दौऱ्याहून परतल्यानंतर लगेचच मोठ्या आनंदाने मंजूर केली.
 ॲक्टिंग जनरल म्हणून काम करत असताना नानासाहेबांनी बडोद्याच्या फौजेत अनेक सुधारणा घडवून आणल्या. एप्रिल १९२४ च्या मॉडर्न रिव्ह्यूच्या अंकात संत निहालसिंह यांचा ‘Glimpses of Baroda' हा लेख प्रकाशित झाला. या लेखात निहालसिंह नानासाहेबांचे कौतुक करताना लिहितात, “For the first time in the recent history of the Baroda Army an Indian, Colonel Shinde, a fine figure of a man and a writer on military subjects is in command." चार वर्षे अॅक्टिंग जनरल पदाची धुरा सांभाळल्यानंतर १३ डिसेंबर १९२६ रोजी नानासाहेबांना जनरल पदावर कायम करण्याचा हुकूम सयाजीराव महाराजांनी दिला. नानासाहेब

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ४३