हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिली गेली. दंगल उसळण्यामागील हे मुख्य कारण आहे. यावर जोरदार चर्चाही झाली." (शरिया हे बिहारमधील एक प्रमुख मुस्लिम धर्मस्थान आहे.)

 एक वर्षापूर्वी बिहारशरीफ येथे हिंदू-मुस्लिम दंगल उसळली होती. त्याही वेळी जागेबाबतचा वादच मुळाशी होता.

 पुण्यात चालू वर्षी दंगल झाली. मशिदीला हात न लावता रस्तारुंदी होऊ घातली होती. पतितपावन या हिंदुत्ववादी संघटनेने याला आक्षेप घेतला. वाटेत येणारे देऊळ काढले तशीच मशिदही काढा, नाहीतर देवळाला हात लावू नका, अशी मागणी होती. यातून तणाव वाढत गेला व पर्यवसान शेवटी एका कार्यकर्त्याच्या मृत्यूत व दंगलीत झाले.

 आता ओगलेवाडीला हेच घडले-घडत आहे.

 अचानक, बेकायदा देवस्थाने उभी राहतात. यांना हरकत घेतली तर तणाव वाढतो, दंगली उसळतात. अशी बेकायदा बांधकामे वेळीच हटवून दंगलीचे मूळ कारण दूर करायचे की, हरकत घेणाऱ्यांनाच दोषी ठरवून पकडायचे ? तुरुंगात डांबायचे ?

 आपण जर खरे सेक्युलरवादी, धर्मनिरपेक्षवादी असू तर बेकायदा बांधकाम मशिदीचे आहे की मंदिराचे आहे इकडे लक्ष न देता, ते बेकायदा आहे, रहदारीला, शांततेला त्रासदायक आहे, या एकाच कारणास्तव ते प्रथम वेळीच हटवा असे म्हणू; पण आपण काँग्रेसछाप सेक्युलरवादाचे पाईक असू तर मंदिरे पाडू, पण मशिदींना हात लावणार नाही. अशा पक्षपाती सेक्युलॅरिझमचा निषेध म्हणून हिंदू एकता आंदोलन किंवा पतितपावन या किंवा अशा चळवळी नेहमीच उभ्या राहणार, यापुढे बहुजनसमाजाचा त्यांना वाढता पाठिंबा लाभणार. यशवंतराव चव्हाणांनी किंवा बाबासाहेब भोसल्यांनी कराड-ओगलेवाडीमधून कितीही पदयात्रा काढाव्यात; तरुण माणसे यापुढे त्यांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत, हेच कराड-ओगलेवाडी दंगलींनी दाखवून दिले आहे.

 फुलवारीशरीफ येथील जो जमिनीचा तुकडा दंगलीला कारणीभूत ठरला तो इमारत-ए-शरियाला देऊ नये, असा बिहारचे माजी मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांचा पूर्वीचा स्पष्ट आदेश होता; पण सध्याचे मुख्यमंत्री डॉ. जगन्नाथ मिश्रांनी सौदा केला. मुस्लिम मते गेल्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला मिळाली व जमिनीचा तुकडा शरियाच्या पदरात पडला. कुणीतरी कोर्टात गेले. या जमिनीवर बांधकाम करू नये हा कोर्टाचा मनाईहुकूम. तरी सरहद्दगांधी खान अब्दुल गफारखान पाटण्याला आले असताना त्यांच्या हस्ते इंदिरा काँग्रेसचे मुख्यमंत्री डॉ. जगन्नाथ मिश्रांच्या उपस्थितीत, शरियाच्या नव्या बांधकामाचा कोनशिलासमारंभ साजरा

॥ बलसागर ॥ १०२