हे पान प्रमाणित केलेले आहे.

 

 रा. स्व. संघाचे महाशिबिर

 

 विधायक कार्य आणि मूलभूत कार्य या दोन वेगळ्या संकल्पना आहेत.
 विधायक कार्याचा भर मुख्यत: आर्थिक - सामाजिक विकासावर आहे. शाळा काढणे, रस्ते - विहिरी खोदणे, शेती - ग्रामोद्योगांची प्रगती साधणे, याला सर्वसामान्यपणे विधायक कार्य असे म्हटले जाते.

 याउलट मूलभूत कार्य म्हणजे व्यक्तीचा विकास घडवणे. माणूस हा मुख्यतः स्व-केन्द्रित प्राणी आहे. या मनुष्यप्राण्याच्या 'स्व'चा परिघ वाढवणे, माणसाला आपल्या स्वार्थाच्या, अप्पलपोटेपणाच्या, वैयक्तिक संकुचित जीवनाच्या कोशातून बाहेर काढून, त्याला व्यापक सामाजिक-राष्ट्रीय व अंतिमतः मानवीय हिताच्या प्रवाहात आणणे, हे मूलभूत कार्याचे वैशिष्ट्य असते.

 रा. स्व. संघ असे जाणीव-विकसनाचे मूलभूत कार्य करतो असे संघ संस्थापनेपासून सतत सांगितले जात आहे.

 पुण्याला पुढच्या आठवड्यात भरणाऱ्या रा. स्व. संघाच्या महाशिबिराचा उद्देशही काही वेगळा नाही, असे संघ-प्रमुखांनी नुकतेच एका पत्रकार - परिपदेत सुस्पष्टपणे सांगितले आहे. रा. स्व. संघाचे प्रांत-संघचालक मा. बाबाराव भिडे यांच्या शब्दात सांगायचे तर "माणूस चांगला करणे हेच रचनात्मक काम आहे असे संघ मानतो. ते काम वाढवायचे असेल तर संघाचे काम वाढले पाहिजे. याच उद्देशाने १४-१५-१६ जानेवारीला पुण्यात पर्वतीपाठीमागच्या पठारावर, महाराष्ट्र प्रांताचे हे भव्य शिबिर आयोजित केले आहे."
(तरुण भारत, २९ डिसेंबर १९८२ )

।। बलसागर ।। ११७