हे पान प्रमाणित केलेले आहे.

हे राष्ट्रीय स्वप्न आहे. आज ते धूसर आहे, अंधुक आहे. ते तसेच काही काळ असणे स्वाभाविकही आहे. कारण निर्मितीकाल हा नेहमीच धूसर आणि अंधुक असतो. खलिल जिब्रानचा 'प्रॉफेट' म्हणतो तसा -

 "वस्तुमात्राचा आरंभ अस्पष्ट आणि आकारहीन असतो; पण त्याचा अंत तसा असत नाही..."

 "जीवनाची आणि चैतन्यमय अशा सर्व वस्तूंची गर्भधारणा दंवबिंदूत होत असते, स्फटिकात ती होत नाही.

 "आणि स्फटिक म्हणजे क्षय पावणारा दंवबिंदूच नसेल हे कोण सांगू शकेल ?"...

ऑक्टोबर १९७८

।। बलसागर ।। १४५