हे पान प्रमाणित केलेले आहे.

टिळक म्हणत असत त्याप्रमाणे, कुठल्याही तत्वज्ञानाचा कस शेवटी कुरुक्षेत्रावर लागत असतो, भोजनाच्या ताटावर नाही. कुरुक्षेत्र लांब नाही. एकात्म मानववादी तत्वज्ञानाचे उपासक या कुरुक्षेत्रावर केव्हा दाखल होतात, कशी व्यूहरचना करतात यावर शेवटी या तत्वज्ञानाचे यशापयश अवलंबून राहणार, हे उघड आहे.

२५ सप्टेंबर १९७८

।। बलसागर ।। १६७