हे पान प्रमाणित केलेले आहे.

 
 विजय

 

 यशस्वी व्यक्ती तेजस्वी असतातच असे नाही. यशाला तेजाची झळाळी संघर्षामुळ प्राप्त होत असते. इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्त्व असे संघर्षप्रिय आणि लढाऊ आहे, हे काँग्रेस महासमितीच्या बंगलोर अधिवेशनापासूनच स्पष्ट होऊ लागलेले हात. प्रथम त्यांनी काँग्रेसमधील विरोधकांवर चाल केली. मध्यावधी निवडणुकात त्यांनी काँग्रेसबाहेरील विरोधी पक्ष भुईसपाट केले आणि आता तिसरे भारत-पाक युद्ध जिकून, त्यांनी आपले आंतरराष्ट्रीय स्थानही निश्चित करून टाकले. यापुढे भारताला नगण्य समजून, निदान आशिया खंडातील राजकारण तरी कोणी खेळू शकणार नाही. बड्यातला बडाही. हे यश इंदिरा गांधींच्या लढाऊ मुत्सद्देगिरीचे आहे. सारा भारत या त्यांच्या पराक्रमावर आज लुब्ध आहे. एक वीरांगना म्हणून उद्याचा भारतही त्यांची स्मृती चिरकाल जतन करणार आहे. दोन वर्षापूर्वी, राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात दिल्लीतील सर्वसामान्य जनता म्हणत होती

जब तक बहे जमनाका पानी
तब तक रहे इंदिरा रानी
- आणि आज सारा भारतवर्ष हे जयगान करीत आहे.
- उद्याच्या भारतवर्षातही या जयगानाचे सूर निनादत राहतील.


 या बांगलादेश युद्धातील आपला सामरिक विजय मात्र अभिमानास्पद असला तरी राजनैतिक विजयासारखा दैदीप्यमान नाही. आंतरराष्ट्रीय विजय

।। बलसागर ।। ६०