हे पान प्रमाणित केलेले आहे.

कझिन्सच्या 'Talks With Nehru' या पुस्तकातले आहे. नेहरू म्हणतातः "हिंदुधर्माच्या उदरात एक तेजस्वी विश्ववाद आहे. निरनिराळ्या आणि परस्परविरोधी विचारांचा समावेश करण्याएवढा हिंदुधर्म विशाल आहे... यापूर्वी हिंदुधर्माने मोठी स्थित्यंतरे पचविली आहेत. बौद्धधर्म जन्मास आल्यावर हिंदुधर्माने त्याच्याशी स्पर्धा केली नाही, त्याला शोषून घेतले."
 असा इतिहास असल्याने आपण आंबेडकरांच्या बौद्ध होण्यामुळे हादरून गेलो नाही. धक्का बसला ; पण तो सहन होईल इतपतच होता.
 मीनाक्षीपुरम्चा धक्का मात्र मोठा का वाटतो ? हरिजन बौद्ध होण्याऐवजी मुस्लिम झाल्याबरोबर किंवा त्यांनी ख्यिस्ती धर्माचा अंगिकार केल्याबरोबर चित्र एकदम का पालटते ?

 कारण बौद्ध झाला तरी हरिजन समाज भारतीय परंपरेपासून तुटून अलग पडत नाही. मुस्लिम किंवा ख्रिश्चन झाल्यावर मात्र तो भिन्न परंपरेचा अभिमानी होतो व त्याचे राष्ट्रियत्वच बदलते. याचा अर्थ स्वतःला प्रथम भारतीय मानणारे न्या. छगला, रफी अहमद किडवाई किंवा बॅ. अंतुले मुस्लिम समाजात निर्माण होत नाहीत असा नाही. बॅ. अंतुले निखालसपणे शिवाजीला आपला पूर्वज मानतात व मी नाक्षीपुरम्सारखे धर्मातर देशाला हानीकारक, धोकादायक आहे असे स्वच्छपणे सांगतात, तेव्हा त्यांच्या मुस्लिम असण्या-नसण्याचा काही प्रश्नच उत्पन्न होत नाही; पण असे अपवाद मुस्लिम समाजात फारच थोडे आढळतात. बहुसंख्य मुसलमान क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय झाल्यावर फटाके वाजवणारेच असतात. पूर्वीपासून ही वस्तुस्थिती हिंदुत्ववादी सांगत आलेले आहेत व अलीकडे, हमीद दलवाई प्रभृतींनी ती सांगायला सुरुवात केल्यानंतर समाजवादी-काँग्रेसवादी जनांना ती मान्य करण्यावाचून गत्यंतरच उरले नाही. राष्ट्र सेवा दल पत्रिकेच्या १९६७ च्या दिवाळी अंकात हमीद दलवाई यांचा ‘भारतीय मुसलमानांचे अंतरंग' या नावाचा एक लेख आहे. या लेखात व त्यानंतर अनेक व्याख्यानांतून हमीद दलवाईनी मुसलमानांच्या पाकिस्तानधाजणे पणाची स्पष्ट जाणीव आपल्याला करून दिलेली आहे. वरील लेखात त्यांनी म्हटले आहे.-'अलीगड विश्ववि द्यालयाच्या एका प्राध्यापकाने माझ्याशी बोलताना, क्युबेक मधील वाढलेल्या फ्रेंच लोकसंख्येचे उदाहरण देऊन, भारतातील ‘मुसलमानांनाही व्यवेकमधील फ्रेंचांप्रमाणे आपल्याला भारतात आणखी एक स्वतंत्र भूमी निर्माण करता येईल !' हे काढलेले उद्गार मुस्लिम मनोवृत्तीचे यथार्थ दर्शन घडवतात. इंग्रजी (क्यबेकमधील फ्रेंच कॅथॉलिक आहेत.) कैनेडियन प्रॉटेस्टंट असल्यामळे ते कुटुंबनियोजन करतात .कॅथॉलिकांनी कुटुंनियोजन न केल्यामुळे गेल्या ७५ वर्षात त्यांनी आपली

।। बलसागर ।। ८२