पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/348

हे पान प्रमाणित केलेले आहे.

काढून ट्रकमध्ये भरत होते. त्याची आजारी मुलगी एका खाटेवर पडली होती. तिला उतरवून खाली ठेवून ती खाटसुद्धा उचलून नेण्यात आली. कोणीतरी ठरवून व्यंकटरामाचा सूड उगवत होते. व्यंकटरामा जवळच्या कृषिसेवाकेंद्रात गेला, कीटकनाशकाची एक बाटली उघडून प्याला, घराजवळ पोहोचला. बँक अधिकाऱ्यांचा धिगाणा चालूच होता. लडखडत्या पायांनी तो घरासमोर पोहोचला आणि जमिनीवर कोसळला, थोड्याच वेळात निष्प्राण झाला.
 तेरा वर्षांच्या आपल्या मुलाला त्यांची विधवा आई म्हणाली, 'आता आपलं काही खरं नाही. मी हे औषध पिऊन जीव देणार आहे. तुला सरकारातून काय पैका भेटल त्यातून होईल तितकं कर्ज फेड आणि बाळा तू औक्षवंत हो' तिच्या पोराने आईला समजवायचा प्रयत्न केला, 'तू गेली तर मी काय करू गे! मला सोडून जाऊन नको माये' पण आईचा निश्चय पक्का. तिने तो पार पाडला.
 आणखी एक शेतकरी, थोडा जास्त हिंमतवान. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू एका मोठ्या सभेत भाषण देते होते. तो व्यासपीठावर चढला आणि सगळ्यांदेखत विष घटाघटा प्याला.
 मला एक शेतकरी भेटला, त्याने कीटकनाशक पिऊन जीव देण्याचा प्रयत्न केला होता. पण, औषध निघाले भेसळीचे; तो जिवंत राहिला. ज्या भेसळ औषधांनी शेकड्यांनी शेतकऱ्यांवर जीव देण्याची पाळी आणली त्यांनीच या एकट्याचा जीव राखून ठेवला.
 वारंगळमधल्या आत्महत्यांची निश्चित कारणमीमांसा करणे कठीण आहे; पण तेथील शेतकरी कापसाची शेती कशी करतात ते पाहिले पाहिजे. या साऱ्या मृत्यूंचे रहस्य त्यामागेच दडले असण्याची शक्यता आहे.

 वारंगळमधल्या साऱ्या आत्मघातींनी कापूस पिकविण्याकरिता जमीन भाडेपट्टीने घेतली होती. एका हंगामाचे भाडे मगदुराप्रमाणे एकरी रुपये तीन ते पाच हजार. वारंगलच्या शेतकऱ्याच्या डोक्यावर खर्चाचा हा एक मोठा बोजा आहे. इतर शेतकऱ्यांना तो फारसा जाणवत नाही. बहुतेक शेतकऱ्यांना जमीन वारसा हक्काने मिळालेली असते. तिचा नगदी खर्च काही नसतो. अर्थशास्त्रातल्या 'पर्यायी खर्च (Opportunity Cost) या संकल्पेची त्यांना जाणीवही नाही. पीक घेण्याऐवजी आपण जमीन विकली असती व आलेली रक्कम व्याजाने ठेवली असती तर दरसाल जे बिनधास्त उत्पन्न मिळाले असते ते आता मिळणार नाही. कापूस पिकविण्याचा निर्णय घेतला तेव्हा पहिला बोजा घेतला तो व्याजाची

बळिचे राज्य येणार आहे / ३५०