पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/379

हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारखान्यातील कामगारांच्या संघटनांचे काम तर अगदी सुरळीत चालणाऱ्या यंत्राप्रमाणे चालू शकते. सगळे कामगार कारखान्याच्या जागी नियमितपणे येतात. भेटतात. त्याच्यात जवळीक, आपुलकी तयार होते. कुठे काही अन्याय होत असला तर त्याची बातमी विजेच्या वेगाने पसरवन प्रतिकारात्मक हालचाली लगेच चालू करता येतात. लढा पुकारायचा झाला किंवा संप चालू करावयाचा असला तरी एकमेकांशी विचारविनिमय अगदी थोड्या वेळात करून आवश्यक तो निर्णय घेता येतो.
 शेतकऱ्यांची संघटना उभारण्यात सर्वात मोठी अडचण कोणती असेल तर दूरदूरच्या पसरलेल्या खेड्यांशी संपर्क साधणे ही होय.
 ध्येयाची एकवाक्यता
 संघटना उभारण्यात आणखी एक मोठी अडचण म्हणजे सर्वसंमत ध्येय निश्चित करणे. शेतकऱ्यांचे प्रश्न इतके विविध आणि इतके मोठे आहेत की त्यातील नेमके कोणते हाती घ्यावे हे ठरवणे फार कठीण आहे. काही जणांना धरणे, कालवे बांधून पाणी आपापल्या गात आणणे ही सर्वांत महत्त्वची गोष्ट वाटते. अशा मागण्यांसी शेतकरी लवकर एकत्र येऊ शकतात पण लवकरच कालव्यांच्या पाण्याचा फायदा मिळणारे शेतकरी आणि धरण योजनांमुळे ज्यांची शेतीवाडी पाण्याखाली जाते ते शेतकरी यांच्यात वाद चालू होतात. कालव्यांच्या वरच्या भागात ज्यांची शेती आहे ते शेतकरी अशा योजनांबद्दल दुर्मुखलेले राहतात. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असला तरी अशा योजनांच्या मागण्याबाबत होणारी संघटना ही भौगोलिकदृष्ट्या मर्यादित क्षेत्रातच होऊ शकते. आपल्या भागातील उदाहरण द्यायचे झाले तर आसखेड धरणाच्या मागणीचे देता येईल. या धरणाच्या मागणीसाठी आसखेड किंवा वाकी गावाच्या पूर्वेस असलेल्या भामनहर खोऱ्यातील गावांची संघटना तयार झाली आहे; पण तिचे स्वरूप तेवढ्या भागापुरतेच मर्यादित राहणार. वाहागाव गडद, तोरणे, अम्बु, वांद्रे गावच्या शेतकऱ्यांना त्या मागणीत फारसे स्वारस्य असण्याचे कारण नाही.

 तेच चाकण ते वांद्रे हा साठ किलोमीटरचा रस्ता बांधून काढण्याची मागणी घ्या. या मागणीबाबत सर्व भामनहर खोऱ्यातील सर्व शेतकऱ्यांचे एकमत आहे. त्यासाठी लढा देण्यात ते तयार झाले आहेत. भामनहर शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमात या दोन्ही मागण्यांना फार महत्त्व आहे. पण खेड तालुक्याला सर्व शेतकऱ्यांना त्याचे फारसे आकर्षण वाटणार नाही. पुणे जिल्ह्यातील इतर

बळिचे राज्य येणार आहे / ३८१