पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/46

हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनुभव घ्यायला तुम्हाला मिळणार आहे एवढाच खरा शेगावच्या जाहीरनाम्याचा अर्थ आहे.
 आपल्याला शेतकऱ्यांचं आपल्या मनातलं चित्र पालटणं आवश्यक आहे. जर का शेतकऱ्यांची दुश्मनी करणारं सरकार नसतं तर आपण आज ज्या प्रकारचे शेतकरी झालो आहोत, कुणबाऊ शेतकरी, तसे राहिला नसतो. इथं कुणबाऊ हा जातिवाचक शब्द म्हणून वापरला नाही तर मराठी शब्दकोशातील त्याचा अर्थ माझ्या मनात आहे. आपण सीताशेती करणारे, व्यापार करणारे, निर्यात करणारे शेतकरी एरवीही बनलो असतो. हजार दोन हजार वर्षे आणखी कोणाच्यातरी जोखडाखाली मान घालून आम्ही फुकट घालविणार नाही, स्वतंत्र रस्ता शोधून आमच्या त्या स्वतंत्र रस्त्याने जाणार आहोत हा खरा शेगावच्या जाहीरनाम्याचा अर्थ आहे.
 (वर्धा येथे १५,१६,१७ डिसेंबर १९९१ रोजी शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्रभरच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री. शरद जोशींनी केलेले भाषण)

(शेतकरी संघटक, २१ डिसेंबर १९९१)

बळिचे राज्य येणार आहे / ४८