या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७४ ) या पार्वतीपरिणयांतील वाक्याशी समानार्थक असून प्राचीन बाणोक्तीस पोषक व साक्षीभूतच आहे ! असें कोणाच्याहि ध्यानांत येण्यासारखें आहे. तसेच- 'अचिरप्रोषिते सवितरि शोकविधुरा कमलमुकुलमण्डलधारिणी हंससितदुक्कुलपरिधाना मृणालघवलयज्ञोपवीता मधुकरमण्डलाक्षवलय- मुद्दहन्ती कमलिनी दिनपतिसमागमत्रतमिवाचरत् । ' ह्या कादंबरीतील वाक्यसमूहाची व पार्वतीपरिणयांतील पुढील पद्याची बरीच समानार्थकता जमते, तें पद्य फिरून येथें देतों. “ आध्य प्रणयं विवस्वति गते देशान्तरे पद्मिनी- सोडुं तस्य वियोगमक्षमतया म्लायत्सरोजानना सन्ध्यावल्कलिनी द्विरेफपरिषद्राक्षमाळावती तत्माप्तिस्येव संप्रति तपःसक्ता समालक्ष्यते ॥ " या ठिकाणी दोहींतील संध्याकालचें रूपकालंकारांतील कल्पनासादृश्य बरेंच जमून आले आहे, असे कोणाच्याहि लक्षांत येण्यासारखे आहे. यावरून हे नाटक प्राचीन बाणकवीचें नसेलच असें चणणे बरोबर वाटत नाहीं, आणखीहि त्यांनीं कांही प्रमाणे मणून दिली आहेत, परंतु त्या पासून समाधान व खात्री होत नाहीं. तेव्हां पार्वतीपरिणय हें प्राचीन बाण- कवीचें आहे, किंवा अभिनवबाणकवीचें आहे, याबद्दल त्यांनी दिलेल्या प्रमाणांवरून उलगडा होत नाहीं. आतां हे कोणाचेंहि असले तरी त्यांत कवित्व आहे, असे मला वाटतें व तें मीं दाखविलेंच आहे. आतां कादंबरी इत्यादि ग्रंथांतल्यासारखे कवित्व यांत नाहीं हें खरें. परंतु कादंबरीसारखे वर्णनाचे विषय निराळे व नाटकाचे निराळे. नाटकांतील रचना कादंबरी सारखी होणे शक्य नाहीं. तसेंच कोणत्याहि ग्रंथकारांच्या अनेक प्रकारच्या ग्रंथांत सर्वत्र उत्तम प्रकारची एकसारखी रचना व सुरसता उतरतेच असें ह नाही. तर ती कमीजास्त प्रमाणा असते. फार दूरचीं प्रमाणे कशाला ! बाणाच्या हर्षचरितांत सुमारें तीसपस- तीस पद्ये आहेत. त्याच्या चंडिकाशतकांतहि शंभर पर्छे आहेत, परंतु त्यांत सर्वत्रच सारखें कवित्व कोठें आहे ! बाणाच्या कादंबरीसारखा रस- परिपाक त्याच्या हर्षचरितांत तरी सर्वत्र अगदर्दी तंतोतंत कोठें उतरला आहे. परकीय कवि मिल्टन याच्या 'प्यारेडाइज लॉस्ट' काव्यासारखें 'प्यारे-