या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७६ ) उच्छासांत उल्लेख केलेला आहे, व त्या नाटकाच्या टीकेंत प्रसंगानें त्यांतील एक पद्यहि दिलेले आहे. तें असें : - 'यदाह मुकुटताडितकनाटके बाणः- “ आशा: प्रोज्झितदिग्गजा इव गुहाः मध्वस्तसिंहा इव । द्रोण्यः कृत्तमहाद्रुमा इव भुवः प्रोत्खातशैला इव बिभ्राणाः क्षयकालरिक्तसकलत्रैलोक्यकष्टां दशाम् जाता क्षीणमहारथाः कुरुपतेर्देवस्य शन्याः सभाः भीष्मद्रोणासारखे अतिरथी महारथी नाहींतसे झाल्यामुळे कुरुराज दुर्योधन याच्या सभा कशा शून्य दिसल्या, याबद्दल बाणकवीनें या कवि- तेत किती सरस व स्वाभाविक उपमा दिल्या आहेत, त्या पाहून सहृदय- जनांस स्वचितच आनंद झाल्यावांचून राहणार नाहीं. ! हें नाटक कोठें कोणाला उपलब्ध झाले असल्याचे अद्याप समजलें नाहीं. बाणकवीची व तशींच भासादि इतर कवींचीं आणखी अशीं किती काव्य- रत्ने नष्ट झाली असतील तीं असोत ! ! 6 आणखी ' सर्वचरित' झणून एक नाटक बाणकवीच्या नांवावर असल्याचें समजतें, परंतु तेंहि अद्याप प्रसिद्ध झाल्याचे समजलें नाहीं. बाण, दोघे श्रीहर्ष व त्यांचे ग्रंथ. ( कै. वि. कृ. चिपळूणकर व डॉ. वुइल्सन. ) एकाच नांवाने प्रसिद्ध परंतु भिन्नभिन्न असलेल्या श्रीहर्षकवींचा व बाण व रत्नावाल यांचा नांवाजलेल्या विद्वानांनी देखील मोठा घोटाळा केलेला आहे. याकरितां यासंबंधानें विवेचन करणे अत्यंत आवश्यक आहे. "9 ' रत्नावलि ' या नाटकाचा कर्ता श्रीहर्ष आहे. तथापि त्याचा कर्ता बाणकविच असावा, अर्से कित्येकांचें मत आहे. परंतु ते चुकीचें आहे. ' रत्नावाले ' ही बाणकवीनें केली असे प्रतिपादन करणान्यांच्या झणण्यास सबल आधार आहे असें बिलकूल दिसत नाहीं ? श्रीहर्षाच्या १ हें नाटक लाहोर येथें राधाकृष्ण पंडित यांच्या येथील पुस्तकांच्या यादींत ' बाणकवी ' च्या नांवावर नमूद केलेले आहे. २ बाणानें स्ववर्णन विषयक हर्पराजास ' हर्ष ' असेंच झटले आहे. परंतु ताम्र- पत्रांतील लेखांत आणि रत्नावळि वगैरे नाटकांत त्यास श्रीहर्ष असेंच झटलेले आहे.