या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८१ ) " येथा यूनस्तद्वत्परमरमर्णायापि रमणी- कुमाराणामन्तःकरणहरणं नैव कुरुते । मदुक्तिश्चेतश्चेन्मदपति सुधीभूय सुधियः किमस्या नाम स्यादरसपुरुष | राधनरसैः ॥ " पुढे श्रीहर्षाने आपल्या बापाचा प्रतिपक्षी उदयन यास जयचंद्रराजाच्या समक्ष भरसभेत कुंठित करून जिंकिलें. मग तो राजाच्या पदरीं मुख्य पंडित होऊन राहिला. , नैपधचरित काव्याखेरीज स्थैर्याविवरण, श्रीविजयप्रशस्ति, खंडनखंड- खाद्य, गौडराजकुलप्रशस्ति, अर्णववर्णन, छंदः प्रशस्ति, शिवशक्तिसिद्धि आणि साहसांकचारते. हे ग्रंथ त्यानें केले असल्याबद्दल नैषधचरितकाव्या- च्या चार, पांच, सहा, सात, नऊ, सतरा, आठरा आणि बावीस ह्यां सगत प्रदर्शित केलें आहे. परंतु यांपैकी सांप्रत थोडेच ग्रंथ उपलब्ध अस ल्याचे समजतें ! श्रीहर्षाचें नैपधचरित काव्य मात्र लोकांत फारच प्रसिद्ध असलेल्या 'पंचमहाकाव्यांत' गणले जात असून त्यांत बऱ्याच कल्पना नवीन आहेत. हे काव्य प्रौढ असून यांत श्लेषादि अनेक अलंकार व ध्वन्यर्थादि चमत्कार साधले आहेत. तेराव्या सगीत तर नलराजाखेरीज इतर कोणासहि बरायाचं नाहीं, असा दमयन्तीचा निर्धार असल्यामुळे इन्द्र, अग्नि, यम, आणि वरुण हे दमयन्तीची प्राप्ति व्हावी ह्मणून नलराजाच्या समान रूपें धारण करून विवाहमंडपांत येऊन राजमंडळीत बसले असतां सरस्वतीनें इंद्रपर व नलपर याप्रमाणे प्रत्येक लोकपाल व नल यांचें खुबीदार वर्णन केले आहे. कांहीं श्लोकांत तर अनेकार्थ साधिले आहेत. या सर्गास ' पंचनली ' असें ह्मणतात. तथापि या काव्यांत बन्याच ठिकाणी क्लिष्टताहि आहे. हर्षाचें दानशूरत्व. हर्ष हा मोठा धर्मशील राजा होता है बाणाच्या व हूएनसँगच्याहि वर्णनांत आहे. बाणकवीचें वर्णन प्रायः श्लेषादि अलंकारांत असते. ' हार. मौक्तिकांची प्रभा हर्षाच्या अंगावर पडल्यामुळे यावज्जीव सर्वस्वदान कर - १ हाच श्लोक त्यानें नैपधचरित काव्याच्या शेवटीं प्रशस्तीत दिला आहे. त्यांत ' केव' याच्या जागी 'नैव' व 'मदुक्तिश्बदन्तर् ' असे पाठांतरहि केलेले आहे. २ ' खण्डनखण्डखाद्य ' या ग्रंथांत श्रीहर्षानं आपल्या पित्याचा प्रतिस्पर्धी उदयन याच्या मताचें खंडन केले आहे असे कळते. ११