या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८२ ) ण्याचें त्यानें हें दीक्षावल्कलच धारण केले आहे काय ? ‘जीवितावधि गृहीत सर्वस्वमहादानदीक्षाचीवरेणेव हारमुक्ताफलानां किरणनिकरेण. मातृतवक्षःस्थलम् ।' अशी बाणानें उत्प्रेक्षा केली आहे. यावरून पृथ्वी जिंकल्यावर रघुराजाप्रमाणे त्याने सर्वस्वदान यज्ञ केलें असें दिसतें. या एका विशेषणावरून देखील प्राचीनकालीं या देशचें वैभव कसें होतें हे लक्षांत येण्यासारखे आहे. ! वाणानें हर्षराजाच्या वर्णनांत " नास्य घनदस्येव निष्फलाः सन्निधिलाभाः । हर्षराजाचे निधि (द्रव्यसंचय ) कुबेराच्या ( नऊ ) निघींसारखे निष्फल नाहीत, असें ह्मटलें आहे. ते सफल केव्हां होतात ? हें हर्षानेंच स्वतः शिलालेखांत सांगितले आहे. ते असें:-- 'लक्ष्म्यास्तीडत्सीललदंचंचलाया दानं फलं परयशः परिपालनंच -' विद्युलता व जलबुदबुद याप्रमाणे चंचल अशा लक्ष्मीचें दानधर्मकरणे व यश संपादणें - हेंच फल होय. असें त्यानें ह्मटल्याप्रमाणे आपल्या द्रव्याचा दान- धर्माकडे व यश संपादण्याकडेच व्यय करून 'वित्तस्य पात्रे व्ययः' या वचना- प्रमाणे आपल्या राज्यसंपत्तीचें साफल्य केलें, ही खरोखरीच मोठी प्रशंसनीय गोष्ट आहे ! हुएनसँगनेंहि हर्ष हा दर पांच वर्षांनी आपल्या खजिन्यांत जमलेल्या द्रव्याचा दानधर्म करीत असे असें झटले आहे ' सकलभुवनकोश- श्वाग्रजन्मनां विभक्तः ' त्यानें सर्व खजिना ब्राह्मण व श्रमण इत्यादिकांस देण्यांत , 1 Silàditya’s Charity --Silāditya held a solemn distribut- ion of his royal treasures every five years. The Chinese Pilgrim Hiuen Tsiang describes, how on the plain where the Ganges and the Jumna unite their waters, near Allahabad, all the kings of the empire, and a multitude of people, fensted for seventy-five days. Silàditya brought forth the stores of his palace,and give them aways to Brahmans and Buddihsts, monks and heretics without distinction. At the end of the festival he stripped off his jewels and royal raiment, handed them to the by-standers, and like Buddha of old, put on rags of a beggar. By this ceremony the king commemorated the Great Renunciation of Buddha and also practised the high- est duty laid down by the Brahmans, namely, almsgiving. (1 Brief History of the Indian Peoples by W. W. Hunter P. 81.)