या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

=2 SEP 1996. ( ८५ ) टीकाकारांच्या अंधपरंपरान्यायानें ह्मणण्यास सबळ पुरावा मिळाल्याखेरीज नुसत्या त्यांच्या टीकेंतील परंपरेनें केलेल्या निर्देशावर भरंवसा ठेवणें प्रशस्त वाटत नाही. भरंवसा ठेवण्यासारखा मुख्य ग्रंथ झटला ह्मणजे हर्षराजाच्या वेळीं असलेल्या बाणकवीचें हर्षचरित होय. त्यावरून पाहतां प्रसन्न झालेल्या श्रीहर्षानें वाणकवीसच सन्माने, प्रेम, विश्वास, संपत्ति इत्यादिकांच्या अगदी परमावधीस नेऊन पोचविलें असेंच आढळतें परमीतेन प्रसाद- , जन्मनो मानस्य, प्रेम्णो, विश्रंभस्य, द्रविणस्य, निर्मणः प्रभावस्य च परां कोटिमानीयत नरेंद्रेणेति ' यावरून द्रव्यचसे काय? तर सर्वच गोष्टी श्रीहर्षाकडून वाणकवीस प्राप्त बाल्या होत्या व ह्मणूनच त्याने त्यास ग्रंथारंभी सकलप्रणयिमनोरथा से दुश्री पर्वतोहर्षः अर्से स्वानुभवा- वरून ह्मटले आहे. 6 www 6 6 सारसमुच्चयाख्य काव्यमा व्याख्येत बाणकवीच्या संबंधानें पुढील महत्वाचा लोक आढळतो. त्यावरून श्रीहर्षाच्या दरबारी बाणकवी- चेच वर्चस्व होतें व हर्षानें बहुधन दिलें तें त्यासच दिलें असें लक्षांत येतें. तो श्लोक हा होयः— 6 हेम्नो भारशतानि वा मदमुचां वृन्दानि वा दन्तिनां श्रीहर्षेण समर्पितानि कवये बाणाय कुत्राद्य तत् । या वाणेन तु तस्य सूक्तिनिक रैरुटुंकिताः कीर्तय- स्ताः कल्पप्रलयेऽपि यान्ति न मनाङ् मन्ये परिम्लानताम् " || श्रीहर्षराजानें वाणकवीस सुवर्णभारांची शर्तें दिलीं व अपरिमित गजेंद्र- संपत्ति दिली तरी ती आतां कोठें राहेिली आहे? परंतु बाणकवीनें त्याच्या सत्कीर्ति ( हर्षचरितांत वगैरे ) कोरून ठेवल्या आहेत, त्या प्रलयकालीहि नष्ट ह्मणून व्हावयाच्या नाहीत. रामचरितकाव्यांतहि यास प्रत्यन्तर पुरावा मिळतो तो असाः - 'श्रीहर्षो विततार गद्यकवये वाणाय वाणीफलम्' यावरून वाणकवीनें त्याचें चिरस्थायी यश कोरून ठेवून त्यास मोठी अमोलिक देणगी देऊन ठेवली ! यांत कांहीं संशय नाहीं. तसेच धावक हे त्याचंच दुसरे नांव असावें असें है ध्यानांत येतें. आतां इतर मयूरादिकवि त्याने आपल्या पदरीं बाळगिले होते, त्याअर्थी त्याने त्यांस बहुधन दिलें नसेल असें नाहीं; तथापि बाण- १भार झणजे सुमारे आठ हजार तोळे होतात.