या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८६ ) कवीवरच श्रीहर्षाची अत्यंत मर्जी होती, व तोच त्याच्या पदरी असलेल्या पंडितांत अग्रगण्य होता, असे अनेक प्रमाणांवरून सिद्ध होतें. सुभाषित शा० पद्धति, सूक्तिमुक्तावलि व सुभाषितावाले इ० ग्रंथांत प्रसिद्ध थोर थोर हजारों कवींचीं पद्ये देऊन त्यांच्या खालीं त्या त्या कवींचे नामनिर्देश केले आहेत. त्यांत धावकाचें नांव एखाद्या पद्याखाली देखील आढळत नाही! तेव्हां हर्षानें बहुधन दिलेल्या धावकनांवाचा निराळा कवि मानणे हे अगदी- च अप्रयोजक व युक्तिरहित वाटतें. सारांश, धावक हें बाणाचेंच कांहीं कारणाने दुसरें नांव पडलेले असावे. तेव्हां हर्पानें बहुधन दिलें ते कविश्रेष्ठ बाणासच दिलें व यामुळेच त्याबद्दल अनेक प्रमाणे सापडतात. तशीं दुसन्या कवींविषयीं आढळत नाहींत ! बाण, मयूर, व मातंगदिवाकर. हपेराजास अनुलक्षून बाणे, मयूर आणि मातंगदिवाकर यांनी भिन्न भिन्न कल्पनेची पर्छे रचून त्यास आपापली कवित्वशक्ति दाखवून अनेक प्रसंगी रंजविलें असावें असें दिसतें ! त्यांपैकी प्रत्येकाचें एक एक पद्य पुढे मासल्याकरितां दिलें आहे. आसीन्नाथ पितामही तव मही माता ततोऽनंतरम् संमत्येवहि साम्बुराशिरशना जाया जयोद्धृतये । पूर्ण वर्षशते भविष्यति पुनः सैवानवद्या स्नुपा युक्त नाम समस्तरास्त्रविदुषां लोकेश्वरांणामिदम् || बाणभट्ट. भूपालाः शशिभास्करान्वयभुवः के नाम नासादिता भर्तारं पुनरेकमेव हि भुवस्त्वां देव मन्यामहे । येनाङ्गं परिमृश्य कुन्तलमथाकृप्य व्युदस्यायतं- चोलं प्राप्य च मध्यदेशमधुना काञ्च्यां करः पातितः ॥ मयूरकवि. याते शमं रजसि जातजलाभिषेका १ धावक ह्मणून कोणी निराळा कवि असून त्यासच श्रीहर्ने बहुधन दिलें असार्वे, अशाविषयीं कोणी चांगली प्रमाणे दाखविल्यास आमचा याविषयीं आग्रहच आहे असे कांहीं नाहीं.